कासारसाई धरण हे मावळ-मुळशी तालुक्याच्या सीमेवर असून दोन्ही तालुक्यांच्या प्रगतीस उपयुक्त आहे. परंतू धरणाची क्षमता कमी असल्याने सर्वच गावांना वर्षभर पाणी पुरेल अशा पद्धतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावात नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होत आहे. परंतु नियोजनाच्या अभावामुळे धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम होऊ शकतो आणि सर्वच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. याबाबत ग्रामस्थांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर सबंधितांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ( Joint meeting of Maval Mulshi taluka farmers public representatives and officials with MLA Shelke regarding Kasarasai Dam )
सदर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित विभागाने पुनःसर्वेक्षण करुन पाण्याचा गावनिहाय योग्य विनियोग करावा आणि धरणांवर अवलंबून असलेल्या इतर गावांना पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईल, त्यांच्या पाणी पुरवठ्यावर कुठलाही परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्यादृष्टीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी आमदार सुनिल शेळके यांच्यासह सहाय्यक अभियंता पाटबंधारे राहूल गव्हाणकर, शाखा अधिकारी अमर धायगुडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी दत्तात्रय पवार तसेच पंचक्रोशीतील जेष्ठ ग्रामस्थ, सरपंच, शेतकरी आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पुणे ग्रामीण पोलिस दलात मोठे फेरबदल; अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या, मावळमध्येही ‘या’ पोलिस ठाण्यात नवीन अधिकारी
– आनंदाची बातमी! चांद्रयान-3 ने पृथ्वीभोवती पूर्ण केली एक फेरी, सध्या 42 हजार किलोमीटरहून अधिक उंचीवर प्रवास सुरु