पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) एक जुणे जाणते नेतृत्व आणि पवार कुटुंबीयांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी आमदार वल्लभ बेनके (Vallabh Benke) यांचे रविवारी (दि. 11) रात्री उशीरा निधन झाले. मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यांच्यावर चाकण येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, ते 74 वर्षांचे होते. बल्लभ बेनके यांनी जुन्नर विधानसभेचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले होते. तसेच जुन्नर विधानसभेचे सध्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचे ते वडील होते. सोमवारी (दि. 12) सायंकाळी 4 वाजता हिवरे बुद्रुक (ता. जुन्नर ) येथे वल्लभ बेनके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
वल्लभ बेनके यांना विधानसभेची सलग सहा वेळा उमेदवारी मिळाली. त्यापैकी ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. 1985 ते 2009 या कालावधीत त्यांनी आमदारकी भूषवली. कुशल संघटक, शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा आणि प्रशासनावर पकड असणारा अभ्यासू नेता, सर्व सामान्य कार्यकर्त्यावर जिवापाड प्रेम करणारा, मुत्सद्दी नेता अशी त्यांनी तालुक्यात ओळख निर्माण केली होती. धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी त्यांनी जवळपास दोन वर्ष संघर्ष केला. वल्लभ बेनके यांनी त्यांच्या कार्यकाळात कांदळी येथे औद्योगिक वसाहतीची स्थापना केली. लेण्याद्री आणि ओझर देवस्थानच्या परिसर विकासासाठी निधी मिळवून दिला. नारायणगाव येथे टोमॅटोचे खरेदी विक्री बाजार केंद्र सुरू केले. प्रशासनावर पकड असणारा नेता म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. (Junnar Vidhansabha Former MLA Vallabh Benke Passed Away)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निधनानं शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणारं, जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मी… pic.twitter.com/MBvmoJnPY6
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 11, 2024
अधिक वाचा –
– इंद्रायणी नदी प्रदूषणावर खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत उठवला आवाज । Indrayani River Pollution Video
– वारकरी शिक्षण संस्थेसाठी 5 कोटींचा निधी देणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; आळंदी येथे बंकटस्वामी सदनाचे लोकार्पण
– धक्कादायक! मृत झालेल्या बिबट्याच्या पायाचा पंजा आणि नखे कापून नेली, अवयव चोरीप्रकरणी वन विभागाच्यावतीने गुन्हा दाखल । Pune News