Dainik Maval News : दिनांक २० नोव्हेंबर रोजी कान्हे नायगाव ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये हा सर्वांच्या एकमताने ठराव करण्यात आला यावेळी कान्हे नायगाव गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व गावातील विविध विकास कामावरही चर्चा करण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी व ग्रामस्थांसाठी कर वसुली सुलभ करण्याच्या उद्देशाने कान्हे नायगाव ग्रामपंचायतने घरमालकांसाठी विशेष ५०% कर सवलत योजना सुरू केली आहे. हा निर्णय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत घेतला गेला आहे.
ग्रामपंचायतीकडे जुन्या मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर करांची थकबाकी मोठ्या प्रमाणावर जमा झाली होती. यामुळे स्थानिक विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता व इतर मूलभूत सेवा सुरळीत चालवण्यात अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने घरमालकांसाठी थकबाकीदार कर सवलत योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
सवलतीची व अटी –
– घरमालकांनी सन २०२५-२६ च्या चालू वर्षाच्या करांसह, ०१ एप्रिल २०२५ पूर्वीच्या थकबाकीच्या ५०% रक्कम ग्रामपंचायतीकडे एकरकमी जमा केली, तर उर्वरित ५०% रक्कम माफ केली जाईल.
– ही योजना केवळ घरमालकांसाठी (Residential Properties) लागू असून औद्योगिक, व्यावसायिक किंवा इतर मालमत्तांसाठी नाही.
– सवलत योजना अभियानाच्या कालावधीतच लागू राहील.
ग्रामपंचायतीची भूमिका –
ग्रामपंचायतीने नागरिकांना याबाबत माहिती देण्यासाठी ग्रामसभेत हा विषय मांडणी केली व यावर एकमतने ठराव मंजूर करण्यात आला स्थानिक प्रसार माध्यमांचा वापर केला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade

