Dainik Maval News : राज्यात सध्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुका होत असून तदनंतर लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होतील. याअनुषंगाने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मावळ तालुक्यातील कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटात सौ. आशाताई बाबुराव आप्पा वायकर यांच्या उमेदवारीची सर्वाधिक चर्चा होत आहे.
महिलाभगिनींसह सर्वच स्तरातून आशाताई वायकर यांच्या नेतृत्वाचे स्वागत होत असून जनसंपर्काची त्यांची नाळ दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. नुकताच आशाताई वायकर यांनी जिल्हा परिषद गटात गावभेट दौरा सुरू केला असून त्यांच्या या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यासह नागरिकांसोबत साधत असलेल्या आपुलकीच्या संवादातून त्यांच्या उमेदवारीबद्दल कार्ला खडकाळा गटात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय जनता पार्टी पक्षाचे वरिष्ठ नेते असलेले, माजी जिल्हा परिषद सदस्य बापूराव आप्पा वायकर यांच्या पत्नी असलेल्या सौ आशाताई वायकर या नेहमीच समाजकार्यात अग्रेसर राहिल्या आहेत. वेगवेगळ्या समाजपयोगी उपक्रमातून कार्यक्रमांमधून नागरिकांशी जोडून राहिल्या आहे, होम मिनिस्टर कार्यक्रम असेल किंवा देवदर्शन कार्यक्रम यातून त्यांनी नागरिकांशी असलेले आपले नाते अधिक घट्ट केले आहे. यामुळेच आशाताई वायकर या जेव्हा कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गटातून निवडणुक रिंगणात उतरत आहेत, तेव्हा भारतीय जनता पार्टी पक्षाच्या एक सक्षम प्रभावी उमेदवार म्हणून त्यांची चर्चा होत आहे.
आशाताई वायकर यांचा सध्या सुरू असलेला गावभेट दौरा हा संपूर्ण जिल्हा परिषद गटात चर्चेचा विषय ठरत असून जनसामान्यांचा त्यांना पाठिंबा मिळताना दिसत आहे. नुकतीच त्यांनी वाकसई, देवघर, जेवरवाडी, करंडोली या गावांत भेट देत ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या, तसेच स्थानिक स्तरावर असलेल्या समस्या सोडविण्यासाठी योग्य धोरण ग्रामस्थांपुढे ठेवले. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनातही आशाताई वायकर यांच्या नेतृत्वाबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली असून आगामी निवडणुकीसाठी नागरिकांनी आपला पाठिंबा वायकर यांना दर्शवला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade
