Dainik Maval News : काले पवनानगर ग्रामस्थ, स्व.भाऊ मोरे, व्यापारी मित्रमंडळ यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी एक गाव एक दहीहंडी सोहळ्याचे उत्साहात पवनानगर चौकात आयोजन करण्यात आले होते. यावर्षी सोहळ्याचे हे नववे वर्ष होते.
पवनानगर पंचक्रोशीतील हा एकमेव दहीहंडी सोहळा असतो. यावर्षी सोहळ्यामध्ये पद्मावती महिला गोविंदा पथक ओळकाईवाडी, भांगरवाडी लोणावळा गोविंद पथक , खंडाळा गोविंदा पथक , प्रभात क्रीडा मंडळ घाटकोपर, संयोग गोविंदा पथक इत्यादी पथकांनी सहभाग नोंदविला.यामध्ये खंडाळा गोविंदा पथकाने चित्तथरारक ५ मनोरे उभारून दहीहंडी फोडली.
यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित सर्व गोविंदा पथकांना आमदारांनी शुभेच्छा दिल्या.मनोरे रचताना काळजी घ्यायचे आवाहनही केले.
कार्यक्रमासाठी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण भालेराव,सोहळा समितीचे अध्यक्ष अतुल कालेकर,कार्याध्यक्ष अंकुश शेडगे, अॅड नामदेव दाभाडे,हरीश कोकरे, माजी सरपंच अशोक राजीवडे, भगवान डफळ, अशोक शेडगे, विजय कालेकर, संजय मोहोळ, डॉ. संजय चौधरी, भगवान आढाव, बाळू पवार, सजन बोहरा, धोंडू कालेकर, दत्तात्रय बारकू कालेकर, बबलू कालेकर, मंगेश कालेकर,महिला आघाडी अध्यक्ष सुवर्णा राऊत, जयश्री पवार, सुनीता कालेकर, अनिता मोहोळ,बाळू छाजेड;
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव राजेश राऊत,महागावचे सरपंच संतोष घारे, संदीप बुटाला,प्रल्हाद कालेकर, अमोल कालेकर,शक्ती जाव्हेरी, रघुनाथ आढाव, लहू कालेकर,अनंता कालेकर, रमेश कालेकर,बबन कालेकर,भास्कर कालेकर,राहुल मोहोळ,नारायण कालेकर, श्रीकांत घरदाळे,महेश मोरे, नवनाथ आढाव,शक्ती कालेकर, आदिनाथ गोणते,जगदीश मोरे,आदींच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी पवनानगर पंचक्रोशीतील अनेक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी महिलांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या महिलांना आकर्षण बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोहोळ आणि बबलू कालेकर यांनी केले तर आभार सोहळा समितीचे अध्यक्ष अतुल कालेकर यांनी मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पवनामाईचे जलपूजन, शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती । Pawana Dam News
– वडगाव फाटा येथील वाहतूक कोंडीवर उपाय योजण्याची गरज ! कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी
– पुणे – लोणावळा लोकल : कोरोना काळात बंद झालेली दुपारची लोकल सेवा पुन्हा सुरू करावी