जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी चंद्रभान उर्फ भानू खळदे याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. भानू खळदे ह्याला पोलिसांनी तब्बल 57 दिवसांच्या तपास कार्यानंतर नाशिकमधून अटक केली होती. खळदेची पोलीस कोठडी संपल्याने त्याची रवानगी आता येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. ( Kishor Aware Murder Case Accused Bhanu Khalde sent to Yerwada Jail )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची दिनांक 12 मे 2023 रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती. या हत्येत अटकेत असलेल्या आरोपींच्या जबाबातून प्रमुख आरोपी आणि मास्टरमाईंड म्हणून भानू खळदे ह्याचे नाव समोर आले होते. चंद्रभान विश्वनाथ खळदे (वय 63, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) हा किशोर आवारे यांची हत्या झाल्यानंतर मावळमधून पसार झाला होता. तेव्हापासून त्याच्या मागावर पोलिसांची पथके होती, पोलिसांनी त्याला 8 जुलै रोजी नाशकातून अटक केलेली. ( Kishor Aware Murder Case Accused Bhanu Khalde sent to Yerwada Jail )
अटकेनंतर न्यायालयाने भानू खळदे याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, आता न्यायालयाने त्याची रवानगी येरवडा कारागृहात कऱण्याचे आदेश दिलेत. किशोर आवारे यांच्या हत्येच्या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– पवनामाई फेसाळली, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ; संबंधितांवर कठोर कारवाईची खासदार बारणेंची मागणी
– पुणे ग्रामीण पोलिस दलात मोठे फेरबदल; अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या, मावळमध्येही ‘या’ पोलिस ठाण्यात नवीन अधिकारी