Dainik Maval News : राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर मावळ तालुक्यात राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतला आहे. मावळ तालुक्यात पुणे जिल्हा परिषदेचे एकूण पाच गट आहेत, तर पंचायत समिती मावळचे एकूण दहा गण आहेत. सर्व गट आणि गणांत आरक्षण सोडत झाल्यापासून इच्छुक उमेदवार तयारीला लागले होते. परंतु आता प्रत्यक्षात निवडणूक जाहीर झाल्यामुळे उमेदवारांची धावपळ वाढली आहे.
उमेदवारांची वाढलेली ही धावपळ प्रमुख दोन गोष्टींसाठी आहे, एक म्हणजे पक्ष-युतीचे अधिकृत तिकीट मिळविणे आणि दुसरी म्हणजे मतदारांपर्यंत पोहोचणे. यातील पहिल्या गोष्टींसाठी इच्छुक उमेदवार यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी फिल्डिंग लावायला सुरूवात केली आहे. मावळात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका या भारतीय जनता पार्टी – शिवसेना आणि आरपीआय यांनी युतीद्वारे लढविण्याचे निश्चित केले असल्याची चर्चा आहे. त्याअनुषंगाने कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटाची जागा ही भारतीय जनता पार्टीला मिळेल, अशीच चिन्हे दिसत आहे.
कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टी पक्षाची चांगली ताकद आहे. तसेच याठिकाणी पक्षाचे दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड, ज्ञानेश्वर दळवी, गणेश ठाकर आदी इच्छुक उमेदवार आहे. या सर्वच उमेदवारांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपली छाप पाडली आहे. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टी पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांना कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटाची उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकेल. दरम्यान लवकरच युतीचे सर्व जागांवरील उमेदवार जाहीर होतील, असे भाजपा, शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समिती निवडणूक २०२६ : दहापैकी ‘या’ दोन गणातील उमेदवार असणार थेट सभापती पदाचा दावेदार – पाहा कुठल्या गणात कोणते आरक्षण
– मावळातील ‘या’ झेडपी गटाचा उमेदवार असेल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दावेदार – पाहा मावळात कुठल्या गटात कोणते आरक्षण
– मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण – पाहा गट अन् गणनिहाय मतदारसंख्या ; काले गणात सर्वाधिक मतदार
– अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक