Dainik Maval News : भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड हे पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. मावळ तालुक्यातील कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटातून भाजपाचे इच्छुक उमेदवार म्हणून भाऊसाहेब गुंड निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहेत. सध्या गटातील गावांमध्ये गावभेट दौरा करून ते नागरिकांशी संवाद साधत आहेत. श्री. गुंड यांच्या या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
गावभेट दौऱ्याच्या पहिल्या दिवशी (दि. २४ नोव्हेंबर २०२५) त्यांनी आतवण, कोळे चाफेसर, मोरवे, चावसर, केवरे आणि तुंग या ठिकाणी भेट दिली. ग्रामदैवाचे दर्शन घेऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला. नागरिकांचे प्रश्न समजावून घेत ते सोडविण्यासाठीचे धोरण स्पष्ट केले. यावेळी ग्रामस्थांनी दत्तात्रय गुंड यांना सकारात्मक पाठिंबा दर्शविला.
गावभेट दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी (दि. २५ नोव्हेंबर २०२५) लोहगड, घेरेवाडी, दुधीवरेस धामणदरा, आपटी आणि गेवंडे या गावांमध्ये दत्तात्रय गुंड यांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांकडून अत्यंत उत्साहमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. सर्वच गावांत ग्रामस्थांच्या विशेष बैठका घेत श्री. गुंड यांनी त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. यावेळी गावांमधील समस्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांनीही दत्तात्रय गुंड यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक भावना व्यक्त केली.
गावभेट दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी (दि. २६ नोव्हेंबर २०२५) आतवण, टायगर पॉईंट, कोळे चाफेसर आणि तुंगी या गावांना दत्तात्रय गुंड यांनी भेट दिली. ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी स्थानिक प्रश्नांबद्दलची मांडणी केली. त्यावर सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्याच आश्वास गुंड यांनी दिले.
दत्तात्रय गुंड : भाजपाचा सक्षम उमेदवार
भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याचे वरिष्ठ नेते असलेले दत्तात्रय गुंड हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहिले आहेत, तसेच जिल्हा नियोजन समितीचेही सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. गावचे उपसरपंच ते जिल्हा परिषद सदस्य राहिलेले दत्तात्रय गुंड यांनी आजवर वेगवेगळ्या विकासकामांची पूर्तता करणे, पायाभूत सुविधांची उभारणी करणे यातून आपल्या नेतृत्वाचे आणि सामाजिक कार्याचे दर्शन सर्वांनाच घडविले आहे. आजवर केलेल्या सामाजिक कार्याच्या जोरावरच ते निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरत असून नागरिकांच्या विश्वासाच्या जोरावर निवडणुकीत विजय प्राप्त करण्याचा विश्वास व्यक्त करीत आहे. भारतीय जनता पार्टी पक्षातील कार्यकर्त्यांचे पाठबळ आणि नेतृत्वाचा विश्वास या जोरावर आपण निवडणुकीत विजय संपादन करू, असा विश्वास श्री. गुंड यांनी दैनिक मावळ’ सोबत बोलताना व्यक्त केला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade
