व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, January 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लेक लाडकी योजना : मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाचे ठोस पाऊल, जाणून घ्या योजनेविषयी । Lake Ladki Yojana

मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, कुपोषण व बालविवाह रोखणे आणि समाजात मुलगा-मुलगी समानता प्रस्थापित करणे या उद्दिष्टांसह महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजना सुरू केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 28, 2025
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Lek-Ladki-Yojana

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, कुपोषण व बालविवाह रोखणे आणि समाजात मुलगा-मुलगी समानता प्रस्थापित करणे या उद्दिष्टांसह महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. ही योजना १ एप्रिल २०२३ पासून राज्यात लागू करण्यात आली असून, गरीब कुटुंबांतील मुलींना आर्थिक मदतीद्वारे सशक्त बनवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ही योजना राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

योजनेचे उद्दिष्ट –
• मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे
• मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत प्रदान करून त्यांच्या शिक्षणाची सततता सुनिश्‍चित करणे.
• कुपोषण आणि बालविवाह रोखणे: मुलींचे कुपोषण कमी करणे आणि बालविवाह टाळणे.
• मुलगा-मुलगी समानता वाढवणे: समाजात मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव कमी करून समानता प्रस्थापित करणे.

आर्थिक मदत –
या योजनेअंतर्गत, मुलींच्या जन्मापासून ते १८ वर्षांच्या वयापर्यंत विविध टप्प्यांवर एकूण १,०१,००० ची आर्थिक मदत प्रदान केली जाते.
• जन्मावेळी : ५००० रुपये
• पहिली इयत्ता प्रवेशावेळी : ६,०००
• सहावी इयत्ता प्रवेशावेळी : ७,०००
• अकरावी इवत्ता प्रवेशावेळी : ८,०००
• १८ वषे पूर्ण झाल्यावर : ७५,०००

पात्रता निकष –
• रहिवासः अर्जदार कुटूंब महाराष्ट्राचे स्थायी रहिवासी असावे.
• रेशन कार्ड: कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे
आवश्यक आहे.
• मुलीचा जन्म : १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुली या योजनेसाठी
पात्र आहेत.

आवश्यक कागदपत्रे
• रेशन कार्ड (पिवळे/केशरी)
• मुलीचा जन्म प्रमाणपत्र
• माता-पित्याचे आधार कार्ड
• बँक खाते तपशील
• पासपोर्ट आकाराचा फोटो

अर्ज प्रक्रिया
अर्जदारांनी अंगणवाडी केंद्र किंवा जिल्हा परिषदेचा महिला व बाल विकास विभाग येथे संपर्क साधून अर्ज करावा. स्थानिक स्तरावर सहाय्यक अधिकारी व अंगणवाडी सेविका यांच्याकडून मार्गदर्शन मिळू शकते. ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून, ती मुलींच्या सक्षमीकरणाचा एक व्यापक सामाजिक दृष्टिकोन दर्शवते. शासनाच्या या उपक्रमामुळे राज्यात मुलींच्या शिक्षणात सातत्य, आरोग्य सुधारणा आणि सामाजिक समता यांना निश्चितच चालना मिळणार आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ठरलं तर… मावळ तालुक्यात ‘हे’ 5 पक्ष ‘महाविकासआघाडी’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार
– राज्यावर पुन्हा पावसाचे सावट; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती, मावळातील भातउत्पादक शेतकरी चिंतेत
– दिवाळी संपताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार ; मावळात इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर


Previous Post

आपुलकीचा संवाद साधत मेघाताई भागवत यांनी आमदार सुनील शेळकेंकडे सुपूर्द केला इंदोरी-वराळे गटासाठीचा उमेदवारी अर्ज

Next Post

वडगाव नगरपंचायत निवडणूक : दुबार मतदारांबाबत मुख्याधिकाऱ्यांची सूचना, ३० ऑक्टोबरपर्यंत लेखी अर्ज देण्याचे आवाहन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव नगरपंचायत निवडणूक : दुबार मतदारांबाबत मुख्याधिकाऱ्यांची सूचना, ३० ऑक्टोबरपर्यंत लेखी अर्ज देण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Finally bugle has sounded announcement of Zilla Parishad Panchayat Samiti elections in maharashtra

अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक

January 13, 2026
Caste certificates distributed to 13 families of Thakar community in Vadgaon-Katvi through Mayor Aboli Dhore

नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या माध्यमातून वडगाव-कातवी मधील ठाकर समाजातील १३ कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप

January 13, 2026
BJP new chapter of Fear-Free Mumbai Home Minister Devendra Fadnavis Zero Tolerance policy

भाजपाकडून ‘भयमुक्त मुंबई’चा नवा अध्याय : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची ‘झिरो टॉलरन्स’ पॉलिसी आणि मुंबईकरांचा मोकळा श्वास

January 13, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आज जाहीर होणार, निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद

January 13, 2026
Crime

धक्कादायक ! मित्रांमध्ये दारू प्यायची पैज लागली.. जास्त दारू प्यायल्याने एकाचा मृत्यू, नवलाख उंबरे येथील प्रकार

January 13, 2026
Crime

क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने तळेगावमधील एकाची ५२ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक ; अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल

January 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.