Dainik Maval News : संपूर्ण राज्यभरात सध्या बिबट आणि मानव यांच्या संघर्षाची चर्चा आहे. बिबट्यांचा मानवी वस्तीत होणार संचार आणि हल्ले ह्यावरून चर्चा बैठका होत आहेत. यात काही सामान्यांचे जीवही गेले आहेत. यादरम्यान आता पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. बागायती प्रदेश असणारा मावळ तालुक्यातील पवन मावळ भागात बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले आहे.
मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावात बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. मंगळवारीच (दि. 25 नोव्हेंबर) रात्री शिकार शोधत फिरत असलेला बिबट्या ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे आणि धाडसामुळे पळून गेला. गावातील युवा शेतकऱ्यांनी धाडसाने बिबट्याला हुसकावून लावले. परंतु या प्रकारामुळे ग्रामस्थ धास्तावले असून त्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची माहणी केली आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे, “बिबट्या रोजच्या रोज गावाच्या हद्दीत फिरताना दिसत आहे. त्वरीत कारवाई झाली नाही तर कोणतीही दुर्घटना घडू शकते.” सध्या वनविभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, साळुंब्रे परिसरात तणावाचे आणि सतर्कतेचे वातावरण कायम आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade
