स्वच्छतेबाबत जागृतीसाठी शालेय शिक्षण विभागांतर्गत ‘लेट्स चेंज’ उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या ‘लेट्स चेंज’ उपक्रमांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. ‘लेट्स चेंज’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर्स बनविले गेले आहेत.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, स्वच्छता मॉनिटर्स बनलेले विद्यार्थी स्वच्छतेच्या बाबतीत अमुलाग्र क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांसह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, ‘लेट्स चेंज’ उपक्रमाचे संचालक रोहित आर्या यांच्यासह ‘स्वच्छता मॉनिटर’ विद्यार्थी उपस्थित होते. ( Lets Change initiative Launch of Swachhata Monitor campaign by CM Eknath Shinde )
महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व… pic.twitter.com/oEdQWij92p
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 22, 2023
मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे
महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व… pic.twitter.com/oEdQWij92p
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 22, 2023
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले आणि काही तासात नवीन शिक्षक रुजू झाले; शिळींब गावातील हटके आंदोलनाची जिल्ह्यात चर्चा
– इनरव्हील क्लब आणि पवना मेडिकल फाऊंडेशन मार्फत ‘जीवन रक्षक अभियान’, नागरिकांना मिळाले जीव वाचवण्याचे धडे
– आधी निर्यातशुल्कात 40 टक्के वाढ, त्यानंतर कांद्याबाबत केंद्र सरकारचा दुसरा मोठा निर्णय, लगेच वाचा…