सध्या देशभर लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरु आहे. तीन टप्प्यातील मतदान झाले असून उर्वरित चार टप्प्यातील मतदान आता पार पडणार आहे. पहिल्या तीनही टप्प्यात काही मतदान केंद्रे वगळता देशात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. परंतू या तीन टप्प्यात एक नवा पेच निवडणूक आयोगापुढे उभा राहिला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भारतात मतदान हे गोपनीय पद्धतीने होत असतं. निवडणूक प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने राबवण्यासाठी निवडणूक आयोग काम करतं. त्यासाठी मोठ्या प्रमावर प्रशासकीय यंत्रणा देखील राबत असते. अशात काही नागरिकांच्या थिल्लरपणामुळे मतदानाला गालबोट लागण्याचे प्रकार घडत असतात. अशात आता अलिकडे धुप्या पद्धतीने आपण करत असलेल्या मतदानाचा फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचे खुळही मतदारांच्या डोक्यांत भिनले आहे.
मतदान करताना लपवून मोबाईल मतदान कक्षात न्यायचा. चोरून स्वतःचा मतदान करताना फोटो काढायचा किंवा व्हिडिओ काढायचा आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करायचा, असं हे फॅड सध्या काही मतदारांमुळे निर्माण झालंय. अशा थिल्लरपणाला वेळीच आवर घालण्यासाठी निवडणूक आयोगाने पाऊल उचलायचं ठरवलंय.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यापुढे असा प्रकार करणाऱ्या मतदारावर कारवाई होईल, सोबतच ज्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडेल, तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई होणार आहे. ( Lok Sabha Elections Action will be taken if photos and videos are taken while voting )
मतदान करतानाचे व्हिडिओ काढून रिल्स बनवणाऱ्या मतदारांवर गुन्हे दाखल होणार.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आपण कोणाला मतदान केले हे अशा प्रकारे जाहीर करणे गुन्हा.
मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर पण कारवाई होणार.
राहिलेल्या टप्प्यातील मतदारांनी हा थिल्लरपणा टाळून मतदान करा.#लोकशाही pic.twitter.com/G67miOoYFn
— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) May 10, 2024
अधिक वाचा –
– Breaking ! ट्रक-टेम्पो आणि कार, खोपोलीजवळ 3 वाहनांचा भीषण अपघात; 3 जण ठार, 8 जखमी । Accident On Mumbai Pune Expressway
– वडगाव शहरातील पायी ‘मशाल’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, ‘आता फक्त संजोग वाघेरे पाटील..’ गीताने दणाणला परिसर
– तळेगाव दाभाडे शहरात चोरट्यांची दहशत, भरदिवसा केला गोळीबार आणि… । Talegaon Dabhade Crime