लोणावळा शहराजवळील टायगर पॉईंट इथे मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवलेल्या 4 टपरीचालकांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. तसेच तिथे गोंधळ घालणाऱ्या चौदा पर्यटकां विरोधातही कारवाई करत पोलिसांनी गुन्हे दाखल केले. लोणावळा उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
टायगर पॉइंट हे लोणावळ्यातील पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे केंद्र मानले जाते. रात्री उशिरापर्यंत पर्यटकांची इथे वर्दळ असते. वन खात्याच्या मालकीची जागा असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव व अनैतिक प्रकार टाळण्यासाठी सायंकाळी सात ते सकाळी सात दरम्यान पर्यटकांसाठी हा पॉइंट बंद करण्यात येतो. लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर पॉइंट परिसरात पेट्रोलिंग करत असताना रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास वेळेचे निर्बंध न पाळता चार विनापरवाना टपरीचालकांनी आपला व्यवसाय चालू ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन रउळ, फौजदार सागर अरगडे, शुभम चव्हाण, ऋतुजा मोहिते, लतीफ मुजावर, हवालदार अंकुश नायकुडे, आशा कवठेकर, अंकुश पवार, सुभाष शिंदे, नितीन कदम, केतन तळपे, राहुल खैरे, नागेश कमठणकर, भुषण कुवर, अमोल ननवरे, सचिन गायकवाड, चेतन कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली. ( lonavala police take action against tapri professional who keep shops open till midnight at Tiger Point )
“लायन्स पॉइंट येथे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी वेळेचे बंधन पाळून आपला व्यवसाय करावा. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी भान राखत आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी व नियमांचे पालन करावे” – सत्यसाई कार्तिक (सहाय्यक पोलिस अधीक्षक, लोणावळा विभाग)
अधिक वाचा –
– मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सुभाष पुजारी यांना गोल्ड मेडल
– ‘…अन्यथा शासनाला गावकारभाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल’, गावखेड्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याची सरपंच परिषदेची मागणी
– ‘सफर गड दुर्गांची’, वडगावमध्ये लहान मुलांसाठी किल्ले अभ्यास मोहिमेचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर