व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा नगरपरिषदेचा गलथान कारभार ; प्रक्रीया न करताच पाणी नाल्यामध्ये सोडले जात असल्याने नोटीस । Lonavala News

लोणावळा नगरपरिषदेकडून सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता ते पाणी तसेच नाल्यामध्ये सोडले जात आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 11, 2024
in ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर
waste water

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषदेकडून सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता ते पाणी तसेच नाल्यामध्ये सोडले जात आहे. हे सांडपाणी नाल्यातून पुढे दोन नद्यांमध्ये मिसळून जलप्रदूषण होत असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नगरपरिषदेला नोटीस बजावून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

लोणावळा नगरपरिषदेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू नसल्याची बाब महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत समोर आली. त्यामुळे मंडळाने लोणावळा नगरपरिषदेला नोटीस बजावली आहे. नोटीसीत म्हटले आहे की, नगरपरिषदेने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात नगर परिषदेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित नाही. यामुळे सांडपाणी प्रक्रिया न करता नाल्यास सोडले जात आहे. हे सांडपाणी नाल्यातून पुढे इंद्रायणी नदीत मिसळून जलप्रदूषण होत आहे.

नगरपरिषदेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी स्वतंत्र वीजजोडणी घेतली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. नगरपरिषदेकडून वेगवेगळ्या नाल्यांतून सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जात आहे. हे सांडपाणी पुढे इंद्रायणी आणि उल्हास नद्यांमध्ये मिसळून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. याप्रकरणी नगरपरिषद आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का करू नये, अशी विचारणा मंडळाने केली आहे.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार सांडपाण्यावर प्रक्रीया करणे बंधनकारक असून, याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगरपरिषदेला दंडात्मक कारवाईला सामोरे लागू शकते, असा इशाराही मंडळाने दिला आहे. त्यामुळे, लोणावळा नगर परिषदेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते नदीत सोडले जात असल्याने जलप्रदूषण होत असून या प्रकरणी नगरपरिषदेला नोटीस बजाविण्यात आली आहे, तसेच उत्तर देण्यास 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपी तरुणाला 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ; वडगाव कोर्टाचा निर्णय । Maval Crime
– मोठी बातमी : इंद्रायणी नदीत बुडून मुलाचा मृत्यू… ‘तो’ बुडाला हे मित्रांनी कुणालाच सांगितले नाही, पोलिसांनी ‘असा’ घेतला शोध
– भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी, मावळातील बधलवाडी येथील घटना । Maval Accident News


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’चे काम 90 टक्के पूर्ण, येत्या वर्षात लवकरच होणार लोकार्पण

Next Post

पालकांनो… मुलांचे मित्र बना, त्यांना मोबाईलपासून दूर ठेवा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Parents Be friends with kids keep them away from mobile phones

पालकांनो... मुलांचे मित्र बना, त्यांना मोबाईलपासून दूर ठेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.