Dainik Maval News : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागाव येथील ग्रामस्थांनी भाजपा – शिवसेना युतीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळवून देण्याचा आणि विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. काले – कुसगांव बुद्रुक मध्ये जिल्हा परिषदेसाठी भाजपाचे दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड हे उमेदवार आहेत, तर काले गणात सिमाताई मुकुंद ठाकर हे उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांबाबत मतदारांमध्ये सकारात्मकता दिसून येतन आहे.
मंगळवारी (दि.३) काले पंचायत समिती गणातील भाजपाच्या उमेदवार सिमाताई मुकुंद ठाकर आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार दत्तात्रय गुंड यांनी महागाव येथील घटेश्वर मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर महागाव गावठाण, प्रभाचीवाडी, सावंतवाडी, दत्तवाडी, तिकोणेवस्ती, धालेवाडी, मालेवाडी या गावांत जाऊन डोअर टू डोअर प्रचार केला आणि मतदारांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव वरघडे, पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी उपसभापती कल्याणी ठाकर यांच्यासह गावातील अनेक आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थ महिला भगिनी, युवक – युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा महायुतीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांमुळे गावाचा सर्वांगीण विकास झाल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील कामांमुळे नागरिक समाधानी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी “विकासासाठी योग्य नेतृत्व आवश्यक असून भाजपा महायुतीचे उमेदवारच ते देऊ शकतात” असा विश्वास व्यक्त केला.
तसेच, येत्या निवडणुकीत गावातून भाजपा महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मताधिक्य देण्याचा निर्धार उपस्थित ग्रामस्थांनी बोलताना व्यक्त केला. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो
