शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आज (गुरुवार, 9 मार्च) रोजी जाहीर करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आणि शिंदे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाचे वाचन केले. यावेळी फडणवीसांनी अर्थसंकल्पातून राज्याच्या विविध क्षेत्रासाठी अनेक तरतुदी आणि अनेक नव्या योजनांच्या घोषणा केल्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यासाठी या अर्थसंकल्पातून काय मिळणार, याकडे सर्वच तालुकावासियांचे लक्ष लागले होते. अखेर शिंदे-फडणवीस सरकारने मावळ तालुक्यातील एका विशेष कार्यासाठी तब्बल 25 कोटी रुपयाची घोषणा केली. ( Maharashtra Budget 2023 25 Corer For Saint Jaganade Maharaj Temple Development Of Sudumbare Maval Taluka )
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना राज्यातीस अनेक भागातील महापुरुष आणि संत महात्मे यांच्या समाधी, स्मारक विकासासाठी निधींची तरतुद जाहीर केली. यावेळी मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र सुदुंबरे येथील श्री संत जगनाडे महाराज यांच्या समाधीस्थळाच्या मंदिराच्या विकासाठी देखील सरकारकडून खास 25 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत.
संत जगनाडे महाराज मंदिर – सुदुंबरे
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचे समाधी मंदिर मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी आहे. संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला होती. आणि शेवटी 18 डिसेंबर 1689 रोजी सुदुंबरे मध्येच त्यांचा मृत्यू झाला. जगनाडे महाराज यांचे सुदुंबरे इथे समाधी मंदिर आहे.
अधिक वाचा –
– गुडन्यूज! शिंदे सरकारची नवी ‘लेक लाडकी’ योजना, मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत मिळणार पैसे, वाचा सविस्तर
– ‘महा’बजेट 2023 : शिंदे सरकारची मोठी घोषणा, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा वाढवली, आता इतक्या लाखांपर्यंत मोफत उपचार
– ‘महा’बजेट 2023 : फडणवीसांचे मोठे गिफ्ट, शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना’ जाहीर, वर्षाला मिळणार ‘इतके’ पैसे