राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आज (गुरुवार, 9 मार्च) रोजी विधानसभेत सादर केला. तर, दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर केला.
देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प तयार करताना जनतेच्या सूचना मागवल्या होत्या, तसेच अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. त्यामुळे अर्थसंकल्पात नेमक्या काय काय घोषणा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. महिला आणि बालक यांच्या बद्दल अर्थसंकल्पातील विविध तरतुदी फडणवीस यांनी सभागृहात सांगितल्या. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात शिंदे सरकारकडून नव्या ‘लेक लाडकी’ योजना जाहीर केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काल म्हणजेच बुधवार (दिनांक 8 मार्च) रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यामुळे महिलांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुद करण्यात आली असून राज्य सरकार लेक लाडकी या नव्या योजनेची घोषणा करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. “राष्ट्राची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते, त्यासाठी आम्ही चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करणार आहोत. मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल’, असे फडणवीसांनी सांगितले. ( Maharashtra Budget 2023 Live Updates Devendra Fadnavis Announced New Lek Ladki Scheme Of Shinde Govt )
अशी असेल योजना….
पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये, इयत्ता चौथीत गेल्यावर 4000 रुपये, सहावीत गेल्यावर 6 हजार रुपये आणि अकरावीत 8 हजार रुपये अनुदान दिले जाईल. तसेच लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये दिले जातील, अशी ही योजना असणार असे फडणवीसांनी सांगितले.
अधिक वाचा –
– ‘महा’बजेट 2023 : शिंदे सरकारची मोठी घोषणा, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा वाढवली, आता इतक्या लाखांपर्यंत मोफत उपचार
– ‘महा’बजेट 2023 : फडणवीसांचे मोठे गिफ्ट, शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना’ जाहीर, वर्षाला मिळणार ‘इतके’ पैसे