श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमी आणि जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस वसंतपंचमीच्या निमित्ताने सुरु असणा-या अखंड हरीनाम सप्ताहास व गाथा पारायण सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (रविवार, 29 जानेवारी) सायंकाळी भेट देणार आहेत. डोंगरावरील मंदिराच्या कामाची पाहणी करणार आहेत. तीर्थक्षेत्र देहूगावात तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री भंडारा डोंगरावर जाणार आहेत. याबाबतची माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. ( Maharashtra Chief Minister Eknath Shinde Will Visit Bhandara Dongar And Dehu Said MP Shrirang Barne )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर ट्रस्टच्या वतीने भंडारा डोंगरावर श्री संत तुकाराम महाराजांचे जागतिक किर्तीचे भव्यदिव्य मंदिर साकारले जात आहे. तुकाराम महाराजांचे सर्वात मोठे शिल्प उभारले जाणार असून मंदिराचे काम वेगात सुरू आहे. सुमारे 125 कोटींहून अधिक रुपये खर्च करून मंदिर उभारण्यात येत आहे. मंदिराचे काम 30 ते 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. तुकोबारायांच्या आकाश एवढ्या कार्याला साजेसे भव्य-दिव्य मंदिर व्हावे, ही सकल वारकरी सांप्रदाय व तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणा-या प्रत्येक भाविकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे.
जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर गाथा लिहिली होती. तुकाराम महाराजांची चिंतन भूमी असणा-या या पवित्र ठिकाणी विठ्ठल रूक्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांच्या पुढाकाराने मंदिर उभारले जात आहे. या मंदिराच्या कामकाजाची पाहणी करावी अशी विनंती खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे हे उद्या भंडारा डोंगराला भेट देणार आहेत. मंदिराच्या कामाची पाहणी करणार आहेत.
हेही वाचा – लोणावळा शहर आणि परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून अधिकचा निधी आणणार – खासदार श्रीरंग बारणे
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रस्तावित केलेला 110 मीटर रुंद रिंगरोड मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेदून किंवा बोगदा पाडून जात होता. डोंगराला बोगदा करण्यास वारक-यांचा, संस्थानचा तीव्र विरोध होता. वारक-यांच्या भावना लक्षात घेता भंडारा डोंगराला भेदून जाणा-या रिंगरोडच्या रेखांकनात बदल करण्याची आग्रही मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्याबाबत संस्थांनच्या पदाधिका-यांना सोबत घेवून शासनाकडे पाठपुरावा केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने रिंगरोड भंडारा डोंगराच्या बाजूने घेण्याचा निर्णय घेतला. डोंगराला भेदून रिंगरोड जाणार नाही. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धार्मिक क्षेत्राच्या बाबतीत सकारात्मक राहिले आहेत.
अधिक वाचा –
– ‘बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला वैतागलेत’, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा घणाघात
– मोठी बातमी! कामशेतजवळ जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात – पाहा व्हिडिओ