गाव-खेडे असो किंवा शहरी भाग, प्रत्येक ठिकाणी विजेच्या काही ना काही समस्या या उद्भवत असतातच. तसेच, सामान्य नागरिकांच्या बाबतही वीज संबंधित अनेक प्रश्न किंवा अडचणी असतात. या छोट्या मोठ्या अडचणींसाठी अज्ञानामुळे किंवा माहितीच्या अभावामुळे सामान्यांना बरीच मोठी किंमत मोजावी लागते. काहीवेळा मुजोर अधिकारी किंवा वायरमन अथवा वीज कर्मचारी बेसुमार पैशांची मागणी करतात, त्यातून सामान्यांची पिळवणूक होते. परंतू, आता सामान्यांची हि पिळवणूक थांबावी, यासाठी महावितरण कडून ऑनलाईन तक्रारीची तसेच फोन कॉल तक्रारीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
विजेची कोणतीही समस्या असो ऑनलाईन करा तक्रार –
महावितरण द्वारे महाराष्ट्रात सर्वदूर वीज सेवा पुरवली जाते. त्यामुळे महावितरणचे ग्राहक संख्या सर्वाधिक आहे. सर्वाधिक ग्राहक संख्येमुळे महावितरणला अनेकदा सेवा पुरवण्यास विलंब लागतो. मात्र, याचाच फायदा घेत काही अधिकारी कर्मचारी पैशांची लुबाडणूक करुन नागरिकांना सेवा उपलब्ध करुन देतात. त्यामुळे महावितरणने अनेक महत्वाची पाऊले उचलली आहेत. यात कोणत्या सुविधेला किती वेळ लागणार, तक्रार अधिकारी कोण याची नियमावली बनवण्यात आली आहे. तसेच, महावितरणकडून काही ऑनलाईन सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. ( Mahavitran Online Grievance Service Portal and Toll Free Number )
महावितरण ऑनलाईन सेवा
नवीन जोडणी, वीज बिलावरील नावात बदल / दुरुस्ती, आधार- मोबाईल-ईमेल लिंक, अधिकारी-वायरमन पैसे मागत असल्याची कोणतीही तक्रार, स्थानिक पातळीवरील विजेची कोणतीही समस्या याबाबत ऑनलाईन तक्रार करू शकता
कार्यवाही होईल
☎️ १९१२ / १८००२३३३४३५https://t.co/XlATYWz0MD
— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) December 4, 2023
जर, तुम्हाला नवीन वीज जोडणी करायची असेल, वीज बिलावरील नावात बदल किंवा दुरुस्ती करायची असेल तसेच, आधार- मोबाईल-ईमेल लिंक करायची असेल, अथवा अधिकारी-वायरमन पैसे मागत असेल, तर अशा कोणत्याही स्वरुपाची तक्रार ऑनलाईन करता येऊ शकते. तसेच स्थानिक पातळीवरील विजेची कोणतीही समस्या असल्यास ऑनलाईन तक्रार करता येईल. तसेच यासाठी टोल फ्री क्रमांकावर फोनही करता येऊ शकतो.
तक्रार करण्यासाठी क्रमांक – 1912 / 18002333435
अधिक वाचा –
– दमदार आमदार…! मावळ तालुक्यासाठी आमदार सुनिल शेळकेंनी आणला तब्बल 428 कोटी 91 लाखांचा निधी
– Breaking! द्रुतगती मार्गावर अपघात, दुधाच्या टँकरवरील चालकाचा जागीच मृत्यू
– हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेली पवनानगरी; पवना शिक्षण संकुलात दिंडी सोहळ्याचे आयोजन