Dainik Maval News : माझी वसुंधरा अभियान 5.0, आकाश या घटकांतर्गत ‘माझी वसुंधरा’ अभियानाचा संदेश देण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मकर संक्रांतीनिमित्त ‘पतंग महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद माझी वसुंधरा अभियानात सहभागी असून अभियानांतर्गत पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश या निसर्गाशी संबंधित पाच तत्त्वावर आधारित विविध उपक्रम राबवित आहे. आकाश या घटकांतर्गत ‘माझी वसुंधरा’ अभियानाचा संदेश देण्यासाठी ‘पतंग महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे.
श्रीकांत नारायण चेपे व रमेश पारटे आंतरराष्ट्रीय काईट्स प्लेयर व तळेगाव दाभाडे नगरपरिषद मार्फत हा उपक्रम आयोजित केला जाणार आहे. बुधवारी (दि.8) सकाळी 10 वाजता स्टेशन भागात शर्मा कॉम्प्लेक्सच्या मागच्या बाजूच्या मैदानावर पतंग महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये गोम, समुद्रकिडा, जमिनीवरची अळी, ओक्टोपस, विमान, जेट विमान, इगल, स्नेक अशा विविध प्रकारचे 50 पतंग आकाशात उडविण्यात येणार आहेत.
सदर महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवून महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी
– आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या