मावळ तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडगाव शहरात सध्या अनेक समस्यांनी तोंड वर काढलेले दिसत आहे. रस्त्यांची समस्या ही सामन्यांचे डोकेदुखी ठरत असताना याच रस्त्यांवर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि बेकायदा पार्किंगमुळे होणारा गोंधळ, यातून सामान्य वडगावकरांची सोडवणूक करण्यासाठी वाहतूक समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढावा याकरिता शहर भाजपाच्या प्रतिनिधींनी आज (गुरुवार, दिनांक 20 जुलै) रोजी वडगाव मावळ पोलिसांना मागणीचे निवेदन दिले. ( Make Decisive Solution To Traffic Problem In Vadgaon Mavak City BJP Letter To Police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वडगावमध्ये नव्याने रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले असल्यामुळे रस्ता काही भागात रुंद स्वरूपाचा झाल्याने त्याचा गैरफायदा वाहन चालक घेताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्मशानभूमी लगत दुतर्फा कायम स्वरूपी वाहने रस्त्यावर अवैधरित्या उभी केलेली आहेत, ती हटविण्याबाबत वडगाव शहर भाजपाने पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना निवेदन दिले.
भाजप प्रतिनिधींनी नागरिकांची समस्या मांडताना स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी, दशक्रिया विधी यावेळी बाहेरून येणाऱ्या वाहनांना पार्किंग सुविधा नसून अडचण निर्माण होत आहे. त्या ठिकाणी रस्त्यावर दोन्ही बाजूला अवैधरित्या काही वाहने कायमस्वरूपी उभी केल्याचे दिसून येत आहे. शाळेला जाणारी मुले, बाजारात येणाऱ्या महिला भगिनी आणि बाजूला मारुती मंदिरात येणारे भाविक, जेष्ठ नागरिक तसेच टू-व्हीलरवर प्रवास करणारे सर्वांनाच याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच एखादा मोठा अपघात सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून काही दिवसांपूर्वी नगरसेवक रविंद्र म्हाळसकर यांनी या विषयासंदर्भात वडगाव नगरपंचायतीला निवेदन दिले होते. त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसल्याने वडगाव शहर भाजपाने आज पोलिसांकडे निवेदन दिले. ( Make Decisive Solution To Traffic Problem In Vadgaon Mavak City BJP Letter To Police )
सदर सर्वच गोष्टींची गंभीर दखल घेऊन संबंधित कायमस्वरूपी उभ्या असणाऱ्या वाहनांवर आणि चालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वडगाव शहर भाजपाने अध्यक्ष अनंता कुडे यांच्यामार्फत निवेदनातून केली आहे. यावेळी मा. जि. प. सदस्य चंद्रशेखर भोसले, माजी पं. स. सभापती गुलाबराव म्हाळस्कर, मा. उपसभापती नगरसेवक प्रविण चव्हाण, वडगाव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, भाजपा संघटन मंत्री किरण भिलारे, नगरसेवक किरण म्हाळस्कर,रविंद्र म्हाळस्कर, ऍड विजयराव जाधव, खंडूशेठ भिलारे, अतुल म्हाळसकर, प्रशांत चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! लोणावळा शहरात हंगामातील विक्रमी पाऊस, 24 तासात तब्बल 273 मी.मी. पावसाची नोंद । Lonavala Rain Update
– किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरण : पीडित महिलेने तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे – डॉ. नीलम गोऱ्हे