Dainik Maval Mews : तळेगाव दाभाडे येथील एका ४१ वर्षीय व्यक्तीची अनोळखी महिलेने बँकेतील कामाचे निमित्त सांगून तब्बल ५२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात हा प्रकार घडला. याप्रकरणी सुजित बाबाराव वानखडे (वय ४१ वर्षे, रा. रा. प्लॉट नंबर ३२ / ए, विंचडीम सोसायटी, आकार फाऊंड्री शेजारी, तळेगाव दाभाडे) यांनी बुधवारी (दि. जानेवारी) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, अनोळखी महिला आरोपीवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम ३१८ (४) माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (सी), (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला इंडसइंड बँकेतून महिला आरोपी बोलत आहे, असा फोन आला. त्यात महिला आरोपीने तुमच्याकडील दोन क्रेडीट कार्ड पैकी एक क्रेडीट कार्ड बंद करतो असे सांगुन विश्वास संपादन केला. त्यानंतर इंडसइंड बँकेचे क्रेडीट कार्ड नंबर ५३७६५२४२२९६९८२७५८ यातून एकुण ५२ हजार ५०० रुपये काढुन घेवुन फसवणुक केली. पोलीस निरिक्षक कांबळे हे अधिक तपास करीत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– जागा काही मिळेना अन् कचऱ्याची समस्या काही सुटेना ! टाकवे बुद्रुक ग्रामस्थ कचऱ्याच्या समस्येने हैराण
– येलघोल-धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उद्घाटन
– …तर भाजपालाही उपनगराध्यक्षपद देईन ; वडगाव नगरपंचायतीत भाजपाचा उपनगराध्यक्ष करण्याबाबत आमदार सुनील शेळके सकारात्मक



