मावळ तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणावरून चार जणांनी घरात घुसून एकाला बेदम मारहाण करत पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आली आहे. ( man was beaten up into his house over a love affair In Salumbre village of Maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मंगेश निवृत्ती दोंड (वय 33) यानी याप्रकरणी शिरगाव परंदवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शुक्रवार दिनांक 17 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास साळूंब्रे गावात (ता. मावळ, जि. पुणे) ही घटना घडली. याप्रकरणी प्राप्त फिर्यादीनुसार दिनांक 18 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे, ज्यात दोन महिलांचाही समावेश आहे. शिरगाव परंदवडी पोलिस ठाण्यात आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 452, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमुद तारिख वेळी आणि ठिकाणी फिर्यादी मंगेश दोंड याचा भाऊ सचिन दोंड याच्या प्रेम प्रकरणावरुन चिडून आरोपींनी कारमधून येत फिर्यादीच्या घरात घुसुन शिवीगाळ करुन घरातील लोकांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी याना धक्काबुक्की करुन गाडीत बसून घेऊन जातेवेळी फिर्यादी हे पळून गेले आहेत, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सदर प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून पोहवा साबळे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– देशी बनावटीचे पिस्तूल आणि किलोभर गांजा सह दोन तरूणांना मावळ तालुक्यातील पुसाणे येथून अटक
– तळेगाव दाभाडे शहरात राहत्या घरासमोरून दुचाकी लंपास, अज्ञात चोरट्यावर गुन्हा