Dainik Maval News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत व विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात १४ जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न करण्यात आला. दिनांक १४ जानेवारी रोजी मराठी भाषा संवर्धन पंधरवडाचे उद्घाटन कला वाणिज्य व बी. बी. ए. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य अशोक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळ शिक्षण प्रतिष्ठान संस्थेचे सहसचिव प्रा. वसंत पवार उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे यांनी काव्यवाचन करून विद्यार्थ्यांनीना काव्यमय केले. मराठी भाषा ही आपली माय असून त्यांनी आईवरील कविता सादरीकरण केले. कवी नामदेव ढसाळ, कवी सौमित्र आणि कवी प्रशांत मोरे यांच्या कवितेचे सादरीकरण केले. मराठी भाषा ही संत आणि साहित्य यांना जोडून ठेवणारी आहे.
यावेळी संस्थेचे सहसचिव प्रा.वसंत पवार यांनी देखील विद्यार्थिनींना मराठी भाषा आणि आजची तरुण पिढी यावर मार्गदर्शन करून विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.माधुरी चंदनशिव यांनी केले. आपल्या प्रास्ताविकेत त्यांनी मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा आणि मराठी साहित्य यामुळे आपली मराठी संस्कृती टिकून आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
महाविद्यालयातील प्रा. माधवी शेटे यांनी मराठी भाषेबद्दल प्रेम व्यक्त केले. प्रा. मंगल पोटे यांनी काव्य वाचन केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे या पंधरा दिवसांमध्ये आयोजन करण्यात आले त्यामध्ये वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आणि शुद्धलेखन स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. मनीषा लगड, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग प्रा.सोमनाथ कसबे, प्रा.हेमंत मुजुळगेकर प्रा.श्रुतिका झोडगे, प्रा. स्वाती पाटील, प्रा. साबेरा शेख, प्रा. विकास गवळी, ग्रंथपाल सौ.सुनीता पाटील या सर्वांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौरभ चेचरे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी विकास मंडळाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.योगिता शिंदे यांनी मानले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो

