मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्म’हत्या केल्याचा प्रकार तळेगाव दाभाडे शहरात घडला आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद देण्यात आली असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
2020 ते 13 मे 2024 पर्यंत हा प्रकार सुरु होता. पती, सासू आणि सासरा यांच्या छळामुळे जगणे नकोसे झालेल्या तरुणीने अखेर आत्म’हत्या करत जीवन संपवण्याचा मार्ग पत्करला. मृत मुलीच्या आईने याप्रकरणी फिर्याद दिली असून फिर्यादीवरून पोलिसांनी पती, सासू आणि सासरा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी भादवि कलम 306, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पती विराज मोहन अवघडे (वय 24) याला अटक केली आहे, तर त्याच्या आई-वडीलांवर गुन्हा दाखल केला आहे. ( married woman commits suicide Shocking incident at talegaon dabhade )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार मुलीचे आणि आरोपीचे 2020 मध्ये लग्न झाले होते. तेव्हापासून आरोपी विराज हा मुलीला मानसिक आणि शारिरिक त्रास देत होता. तर विराजची आई आणि वडील मानिसक त्रास देत होते. त्यातून जगणे असह्य झाल्याने मुलीने अखेर जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. तळेगाव दाभाडे पोलिस पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– यशदा येथे विज्ञान आणि नैसर्गिक शेती या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन । Pune News
– संजोग वाघेरेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास ! बारणेंना फक्त ‘इथेच’ लीड मिळेल, पण आपला विजय ‘इतक्या’ लीडने होणार
– गुडन्यूज ! मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ महिन्यात पूर्ण होणार मिसिंग लिंक प्रकल्प