Dainik Maval News : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी मारुती रामचंद्र देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी देशमुख यांची नियुक्ती जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र दिले.
यावेळी ज्येष्ठ नेते गणेश ढोरे, विठ्ठलराव शिंदे, काळूराम मालपोटे,एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, राष्ट्रवादी ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे, वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, भरत येवले, सुरेश कडू आदी उपस्थित होते.
मारुती देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून, त्यांनी वाकसई ग्रामपंचायतचे उपसरपंच, काळभैरवनाथ मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष, देशमुख विद्यालयाचे अध्यक्ष, तसेच एकवीरा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
आगामी काळात प्रामुख्याने ओबीसी समाजाला पक्षाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहून ओबीसी समाजाचे संघटन वाढविण्यावर भर देणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे निगराणी, 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ; दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सुक्ष्म नियोजन
– मंत्रिमंडळाचा निर्णय : वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर वर्षभरात पूर्ण होणार – पाहा कसे असणार हे मंदिर