Dainik Maval News : देहूरोड स्थानकावरून जाणाऱ्या एक्सप्रेस व कर्जत पॅसेंजर थांबविण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी देहूरोड रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने मशाल मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चाचे नंतर धरणे आंदोलनात रुपांतर झाले. अखेर पुणे येथील मंडल प्रबंधक आणि आंदोलक यांच्यात संयुक्त बैठक होऊन आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
मध्य रेल्वेचे उपविभागीय व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी मंगळवारी (दि.17) पुणे येथे मंडल प्रबंधक आणि आंदोलनकर्ते यांची संयुक्त बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित झाले. रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता.
एक्सप्रेस व पॅसेंजर रेल्वे देहूरोडला थांबविणे, दुपारी दोन वाजता लोकल सुरू करणे, रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, रेल्वे स्थानकावर डिजिटल बोर्ड बसवावेत, मुख्य प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करावे व अतिक्रमण हटवावेत या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत. यावेळी माजी नगरसेवक गोपाल तंतरपाळे, हनुमंत राऊत, सिंधु तंतरपाळे, राजेंद्र तरस, सुनिता चंदाणे, राहुल गायकवाड, महेश गायकवाड, अरुण जगताप, अशोक सोनवणे, राजकुमार कलिमुर्ती, पंकज तंतरपाळे, एकबाल शेख, सत्यवेल चिन्ना उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कार्ला लेणी परिसरात स्वच्छता अभियान ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण सप्ताह संपन्न । Karla News
– एक हजार विद्यार्थ्यांनी केले भगवद्गीतेचे पठण ; ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये गीता जयंती साजरी । Lonavala News
– लोणावळ्यात वंचित बहुजन आघाडीचे ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन । Lonavala News