Dainik Maval News : मस्साजोग (जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाण व हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी, मावळ तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत निवेदन मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची अतिशय क्रूर प्रकारे हत्या करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. असे असताना देखील आरोपी वाल्मिकी कऱ्हाड व त्याचे साथीदार यांना अद्याप अटक झाली नसून त्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर फाशी सारखी कठोर कारवाई करावी. आणि संतोष देशमुख व त्यांच्या कुटुंबाला कायदेशीर न्याय द्यावा. अशी मागणी मावळ तालुका मराठा क्रांती मोर्चा (Maval Taluka Maratha Kranti Morcha) वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी अमोल ढोरे, भाऊसाहेब ढोरे, सुहास विनोदे, तुषार वाहिले, गणेश भेगडे, सुधीर भोंगाडे, वैभव नवघणे, अनिल ओव्हाळ, कैलास खंडभोर, सुशील शिंदे, अमोल बोऱ्हाडे उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार