Dainik Maval News : राजधानी दिल्ली मध्ये आज ( दि. १० नोव्हेंबर ) संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळील गजबजलेल्या परिसरात कार स्फोट झाला असून, या घटनेत ८ जणांचा मृत्यू आणि १५ पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून, लोकनायक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या स्फोटामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तपासानंतर अधिक माहिती अपेक्षित आहे.
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या स्फोटानंतर परिसर संपूर्ण रिकामा करून तपास मोहीम सुरू आहे. सुरक्षा यंत्रणांकडून घटनास्थळाजवळील १३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं जात आहे.
स्फोटाच्या वेळी परिसरात असलेल्या सर्व वाहनांची आणि जवळच्या हॉटेल्स आणि गेस्ट हाउसेसची चौकशी केली जात आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या तपासातून महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर राजधानी दिल्लीसह देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्ली शहर हाय अलर्टवर असून वाहनांची तपासणी आणि सुरक्षा मोहिमा सुरू आहेत. उत्तरप्रदेशात सर्व जिल्ह्यांत अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर महाराष्ट्रातही पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त
Condolences to those who have lost their loved ones in the blast in Delhi earlier this evening. May the injured recover at the earliest. Those affected are being assisted by authorities. Reviewed the situation with Home Minister Amit Shah Ji and other officials.@AmitShah
— Narendra Modi (@narendramodi) November 10, 2025
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून शोक व्यक्त
दिल्ली के लाल किला मेट्रो स्टेशन के पास हुए कार विस्फोट की ख़बर बेहद दर्दनाक और चिंताजनक है। इस दुखद हादसे में कई निर्दोष लोगों की मृत्यु का समाचार अत्यंत दुखद है।
इस दुख की घड़ी में अपने प्रियजनों को खोने वाले शोक संतप्त परिवारों के साथ खड़ा हूं और उनको अपनी गहरी संवेदनाएं…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 10, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त
दिल्ली के लाल किला के पास हुए विस्फोट की घटना ह्रदयविदारक है।
इस दुखद घटना पर दिवंगत आत्माओं को श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। मेरी संवेदनाएं और प्रार्थनाएं शोकाकुल परिवारों के साथ हैं।
ईश्वर से प्रार्थना है कि दिवंगत आत्माओं को शांति मिले और घायलों को शीघ्र स्वास्थ्य लाभ प्राप्त…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 10, 2025
