मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तालुक्यातील दोन सहकारी सोसायटी निवडणूकांत पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. साळुंब्रे पाठोपाठ शिवली विकास सोसायटीवर देखील भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागला आहे. ( Maval BJP Won Shivali Society Election Sharad Ghare Elected As Chairman And Bhau Kokare As Vice Chairman )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सहाय्यक निबंधक वडगाव मावळ यांच्या कार्यालयात शिवली विकास सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक पार पडली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शरद घारे यांची चेअरमन पदी तर व्हाईस चेअरमन पदी भाऊ कोकरे यांची बिनविरोध निवड झाली.
हेही वाचा – साळूंब्रे सोसायटीच्या चेअरमनपदी सतिश राक्षे बिनविरोध, तर व्हाईस चेअरमनपदी ‘यांची’ वर्णी
दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याचे अध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच उपस्थितांनी देखील नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब म्हाळसकर, शिवली विकास सोसायटीमधील भाजपाच्या विजयाचे शिल्पकार ज्ञानेश्वर आडकर, बेबडओहळचे सरपंच जयवंत घारे यांच्यासह सर्व संचालक मंजळ उपस्थित होते. ( Maval BJP Won Shivali Society Election Sharad Ghare Elected As Chairman And Bhau Kokare As Vice Chairman )
अधिक वाचा –
– वडगाव नगरीचे ग्रामदैवत पोटोबा महाराज उत्सवानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल; मानाचे बगाड ते कुस्त्यांचा आखाडा, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे येथील लिंब फाट्यावर अपघात प्रतिबंधक उपाययोजना म्हणून सेफ्टी बॅरिअर आणि चॅनेलायझर
– ब्रेकिंग : शिरगाव सरपंच हत्या प्रकरण, पोलिसांना तपासात मोठे यश, प्रमुख हल्लेखोर आरोपींना सिनेस्टाईल अटक