Dainik Maval News : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे देण्यात येणारा शिक्षण महर्षी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे हा राज्यस्तरीय पुरस्कार यंदा वडगाव मावळ येथील मावळ फेस्टिवल संस्थेस प्रदान करण्यात आला.
पद्मश्री आदर्श सरपंच पोपटराव पवार, दिंडोरीचे खासदार भास्करराव भगरे, आयएएस अधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मावळ फेस्टीवल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण चव्हाण, अध्यक्ष सुरेश जांभूळकर, संचालक अरुण वाघमारे, जितेंद्र कुडे, रवींद्र काकडे, भूषण मुथा, महेंद्र म्हाळसकर, विनायक भेगडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनकरराव जगदाळे, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र गडसिंग, भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक राजेंद्र म्हाळसकर, डॉ. प्रकाश बुरकूटे, रामराव जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. रविवारी (दि.5) नटसम्राट निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी येथे नागरिकांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वडगाव मावळ येथील मावळ फेस्टीवल संस्थला गेली सतरा वर्षांपासून कला, क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करीत आहे. या संस्थेला शिक्षण महर्षी कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी
– आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या