मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने स्थापन माध्यम संनियंत्रण व जनसंपर्क कक्षाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत राजशेखर यांनी समाधान व्यक्त केले. निवडणूक निरीक्षकांनी सीव्हिजील कक्षालाही भेट देऊन नागरिकांच्या तक्ररी संदर्भात करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
निवडणूक निरीक्षक राजशेखर यांनी विविध माध्यमांमधील जाहिराती आणि पेड न्यूजबाबत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली. उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. ( Maval Lok Sabha Constituency Election Inspector Buditi Rajasekhar visit to media room )
माध्यम कक्षात सुमारे 10 दूरचित्रवाणी संचांच्या माध्यमातून वृत्तवाहिन्यांतील निवडणूक प्रचार, जाहिरात, पेड न्यूज आदींच्या अनुषंगाने संनियंत्रण केले जात आहे. तसेच सोशल मीडियावरील पोस्टबाबतही बारकाईने संनियंत्रण केले जात आहे. वृत्तपत्रातील जाहिराती आणि पेड न्यूजबाबतही दररोजच्या वृत्तपत्रांचे अवलोकन केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अधिक वाचा –
– फक्त बघितलं म्हणून दुचाकीस्वाराच्या डोक्यावर तलवारीने वार, तरूण गंभीर जखमी, तळेगावजवळील धक्कादायक प्रकार !
– पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 35 उमेदवार रिंगणात, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांची माघार । Pune News
– पुणे जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, सुटी न दिल्यास ‘इथे’ करा तक्रार । Pune News