मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची राहील, अशी ग्वाही मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी शुक्रवारी (दि. 3 मे) बोलताना दिली. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार शेळके बोलत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आमदार शेळके म्हणाले की, ‘गेल्या लोकसभा निवडणुकीत मी स्वतः पार्थ पवार यांच्या विरोधात काम केले होते, तरी देखील अजितदादांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले. आमदार केले आणि मावळ तालुक्याच्या विकासासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा निधी देखील दिला. अशा नेत्याच्या शब्दासाठी आपण काहीही करू शकतो. अजित पवार यांनी मावळात धनुष्यबाण चालवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आहे.’
‘कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सुधाकर घारे यांच्या रूपाने एक कर्तृत्ववान तरुण न नेता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला आहे. या नेत्याला भविष्यात न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे,’ असे आवाहनही आमदार सुनिल शेळके यांनी केले. यावेळी मेळाव्याच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. ( Maval Lok Sabha MLA Sunil Shelke speech for Shrirang Barne at NCP melava at Karjat )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! ‘पाणी जपून वापरा, पाणी आल्यावर साठा करून ठेवा’, लोणावळा नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन । Lonavala News
– खबरदार ! ‘डीप फेक’ फोटो, व्हिडिओ बनवाल किंवा प्रसारित कराल तर होईल कडक सजा, पोलिसांना मिळालेत थेट आदेश
– कार्ला येथे मतदान ओळखपत्र चिठ्ठी वाटप सुरु, लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याचे मतदारांना आव्हान । Maval Lok Sabha