Dainik Maval News : मावळ लोकसभा क्षेत्राचे खासदार श्रीरंग बारणे यांचे फेसबुक पेज हॅक झाल्याचे समोर आले आहे. याबाबत बारणे यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार दिली आहे. या पेजवरून चुकीचा संदेश, पैशांची मागणी झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन बारणे यांनी केले आहे.
एखाद्याचे फेसबुक अकाऊंट, पेज हॅक करून नंतर मित्र परिवाराला पैसे मागण्याच्या घटना अनेकदा घडतात. सुपरीचीत व्यक्तींचे फोटो वापरून त्यांचे बनावट खाते तयार करण्याचे प्रकार अलीकडच्या काळात सातत्याने समोर येत आहेत. या हॅकींगचा फटका मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना बसला आहे.
- खासदार बारणे यांचे फेसबुकवर Shrirang Appa Barne या नावाने पेज आहे. हे पेज हॅक करण्यात आले आहे. हॅकर्सनी पेजवरील फोटो डिलीट केले आहेत. काही नवीन फोटो टाकले आहेत. ही बाब लक्षात येताच अज्ञात हॅकर्स विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले आहे.
याबाबत खासदार बारणे म्हणाले, फेसबुक पेज हॅक झाले आहे. या पेजवरून आक्षेपार्ह पोस्ट आल्यास त्यावर प्रतिक्रीया व्यक्त करू नका, पैशांची मागणी केल्यास प्रतिसाद देऊ नका, त्याकडे दुर्लक्ष करा, याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भंडारा डोंगरावरील मंदिराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
– तुकाराम..तुकाराम.. नाम घेता कापे यम । लाखो भाविकांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा संपन्न
– पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय, रिंग रोड बाबत महत्वाची माहिती ; ‘या’ 13 गावात भूसंपादनाला वेग