Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पशूधनांना लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. पशुधनासाठी हा विषाणूजन्य साथीचा आजार असल्याने तालुक्यातील काही जनावरांना त्याची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेषतः गाई आणि बैलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येत असून यामुळे पशुधन व दुग्ध, शेती व्यवसाय धोक्यात येऊ शकतो.
- लम्पी चर्मरोगास वेळीच आटोक्यात आणून पशुधनांना वाचविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करून संपूर्ण मावळ तालुक्यातील पशुधनांना मोठ्या प्रमाणात लसीकरण करून योग्य ती काळजी घ्यावी आणि लस पुरवठा अधिक जलद गतीने करावा, असे निवेदन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने गटविकास अधिकारी, पंचायत समिती मावळ यांना दिले आहे.
मावळ तालुक्यातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय प्राधान्य देत आहेत. त्यामुळे तालुक्यात गायींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सततच्या अतिवृष्टी पावसामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव होत असून शेतकऱ्यांच्या हातातील खरीप हंगाम निघून गेला आहे, त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पशुधनाला लंपी चर्म रोगापासून वाचविण्यासाठी लसीकरण आणि औषध उपचार १०० टक्के मोफत होणे आवश्यक आहे.
मावळ तालुक्यातील पशुधन या रोगापासून बचाव करण्यासाठी मावळ पंचायत समिती स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर आवश्यक असणाऱ्या उपाय योजना सुरू कराव्यात व हा चर्मरोग लंपी आजार नष्ट करण्याची आवश्यक असणारी लसीकरण तात्काळ तालुक्यात उपलब्ध करून संबंधित डॉक्टरांना प्रत्येक गोठ्यावरती घरी जाऊन हे लसीकरण मोफत करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन मावळ पंचायत समिती गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान व पशु वैद्यकीय अधिकारी राक्षे यांना देण्यात आले.
याप्रसंगी पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, तालुका प्रभारी तथा पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत, युवक तालुकाध्यक्ष विशाल वहिले, अल्पसंख्यांक अध्यक्ष आफताब सय्यद, तालुका उपाध्यक्ष अनिल खांदवे, वडगाव शहराध्यक्ष सोमनाथ धोंगडे, युवक अध्यक्ष सुनिल चव्हाण, मा.ग्रा. पं. सदस्य बारकूभाऊ ढोरे, योगेश भेगडे आदी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ तालुक्यातील कोअर कमिट्या जाहीर ; सुकाणू समितीसह सात विभागीय कमिट्या – पाहा यादी
– तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना ; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती
– “बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर” ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे