Dainik Maval News : पावसाळा सुरू होऊन काही आठवडे उलटले नाही तोच, आंदर मावळातील राजपुरी – बेलज – टाकवे या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची प्रचंड दूरवस्था समोर आली आहे. ह्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने येथून ये – जा करणारे वाहन चालक, प्रवासी यांनी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने स्थानिक नागरिकांना वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
- सदर रस्त्यावरुन विद्यार्थी, कामगार, दुग्धव्यवसायिक यांना दररोज ये-जा करावी लागते. बेलज ते राजपुरी रस्त्यावर २०१७ नंतर शासनाचा कोणताही निधी पडला नसल्याचे सांगण्यात येत असुन परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतुन साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढुन चालावे लागत आहे.
टाकवे तसेच आंदर मावळातील अनेक कामगार याच रस्त्यावरुन नवलाख उंबरे या ठिकाणी औद्योगिक वसाहतीत मध्ये कामावर जाण्यासाठी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरुन जात आहेत. सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.
रस्त्यावर अवजड वाहतुकीचे अधिक प्रमाण
राजपुरी तसेज बेलज परिसरात क्रशर खाणीची संख्या वाढत चालली असल्याने या रस्त्यावर सध्या क्रशर तसेच दगड वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. यामुळे देखील रस्ता अधिक प्रमाणात खचत असल्याने याठिकाणी रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडत असून छोट्या वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
“टाकवे – राजपुरी रस्त्याकडे शासनाने संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. इतर ठिकाणी अनेकवेळा निधी उपलब्ध होतो, मग याच हा रस्ता करण्यासाठी शासनाकडे पैसे का नाहीत. टाकवे तसेच तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी आम्हाला हाच मुख्य मार्ग असल्याने शासनाने हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा.” – बाजीराव ओव्हाळ, स्थानिक नागरिक, बेलज
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ तालुक्यातील कोअर कमिट्या जाहीर ; सुकाणू समितीसह सात विभागीय कमिट्या – पाहा यादी
– तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना ; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती
– “बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर” ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे