Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत मावळ तालुक्याचा निकाल ९८.२२ टक्के लागला असून लोणावळ्यातील ऑक्सिलीम हायस्कूलची गौरी गणेश शिंदे हि विद्यार्थिनी ९९.२० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे.
मावळ तालुक्यातून दहावीच्या परीक्षेसाठी ५ हजार ४१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २ हजार ७३३ मुले तर २ हजार ६६१ मुली अशा एकूण ५ हजार ३९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दहावीच्या परीक्षेत २ हजार ६७१ मुले तर २ हजार ६२७ मुली असे एकूण ५ हजार २९८ विद्यार्थी पास झाले.
मावळ तालुक्यात दहावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक आहे. मुलांचा निकाल ९७.७३ टक्के तर मुलींचा निकाल ९८.७२ टक्के लागला आहे. तर, तालुक्यातील ८१ शाळांपैकी ४५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
तालुक्यात सर्वाधिक गुणवत्ता प्राप्त केलेले विद्यार्थी ;
१) गौरी गणेश शिंदे – ९९.२० टक्के – ऑक्सिलीम हायस्कूल लोणावळा
२) जान्हवी गणेश दांडगे – ९९ टक्के – रामभाऊ परुळेकर विद्यालय तळेगाव
३) श्रेया वैभव देशमुख – ९८.२० टक्के – बाल विकास विद्यालय तळेगाव दाभाडे
४) तन्वी गोविंद जाधव – ९७.८० टक्के – आदर्श विद्यालय तळेगाव दाभाडे
५) परम गोरख कुंभार – ९७.८० टक्के – सरस्वती विद्यालय तळेगाव दाभाडे
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दहावीचा निकाल जाहीर : किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, किती उत्तीर्ण झाले, विभागनिहाय निकाल ; वाचा सविस्तर निकाल । SSC Result 2025
– दहावी परीक्षेत पवना विद्या मंदिरची विद्यार्थिनी पूर्वा घरदाळे पवनानगर केंद्रात प्रथम ! ग्रामीण भागात यंदाही मुलींचीच बाजी
– वाढदिवसाच्या आदल्या रात्रीच काळाचा घाला ; कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडले ; वडगाव मावळ येथील दुर्दैवी घटना
– मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश ! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, आरोपी अटकेत ; वनविभागाची मोठी कारवाई