Dainik Maval News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये समविचारी पक्षांसोबत आघाडी करून पक्षाने निवडणूक लढवावी, अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्ता बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी केली. तळेगाव दाभाडे शहरात रविवारी काँग्रेस आय पक्षाची बैठक संपन्न झाली. यावेळी ही मागणी करण्यात आली.
तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणूक आणि तालुक्यातील इतर निवडणुकांच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. तळेगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष यादवेंद्र खळदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे, ॲड. राजेंद्र पोळ, तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ, कार्याध्यक्ष गोपाळ तंतरपाळे, प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, शहर महिला अध्यक्षा संध्याराजे दाभाडे, शहर युवक अध्यक्ष विशाल वाळुंज यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रास्ताविक राजेंद्र पोळ यांनी केले. माऊली दाभाडे, यादवेंद्र खळदे, यशवंत मोहोळ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बैठकीचे आयोजन आणि आभार प्रदर्शन विशाल वाळुंज यांनी केले. किरण मोकाशी, बाळासाहेब शिंदे, अमर खळदे, विक्रांत वाळुंज, राम शहाणे, सम्राट कडोलकर, अभिषेक गोडांबे, साधू आरडे, प्रतीक ओंकार, राजू फलके, अक्षय पोटे, संतोष दाभोळे, गणेश काजळे, संभाजी शेडे हेही मान्यवर उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत नवीन डेडलाइन ! ‘या’ महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
– आनंदाची बातमी ! मावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार ‘आदर्श शाळा’ ; २० कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर
– वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती


