Dainik Maval News : मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाच्या अकरापैकी पाच जागा बिनविरोध होण्याची शक्यता असून अर्ज माघारीनंतर त्याची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी दिली.
मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक 27 एप्रिल रोजी होणार आहे. संघाच्या 11 जागांसाठी 52 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. गुरुवारी झालेल्या छाननीत त्यातील 24 अर्ज नामंजूर करण्यात आले. वैध ठरलेल्या 28 जणांची यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली.
अर्ज वैध ठरलेले उमेदवार
सर्वसाधारण कर्जदार मतदार संघ – 6 जागा
खनिज आधारित उद्योग : साहेबराव मोहिते
वनावर आधारित उद्योग : सुरेश जाधव
कृषी आधारित व खाद्य उद्योग : भरत गरुड, अशोक ढोरे
पॉलिमर व रसायन आधारित उद्योग : अंकुश आंबेकर
अभियांत्रिकी व अपारंपरिक उद्योग : छबूराव गायकवाड
वस्त्रोद्योग व सेवा उद्योग : नाथा झांबरे, संदीप मोहोळ, बाळासाहेब धामणकर, बाळू जाधव, ज्ञानेश्वर वाळके, सोपान कदम, शांताराम कदम
महिला प्रतिनिधी (2 जागा) : दीपाली पटेकर, मंगल दळवी, भावना ओव्हाळ, कल्पना कांबळे, कल्पना भोर
अनुसूचित जाती व जमाती मतदार संघ (1 जागा) : अमित ओव्हाळ, संजय गायकवाड, संतोष कदम, नितीन कदम, शांताराम अढाळगे, कल्पना कांबळे
इतर मागास वर्ग मतदार संघ (1 जागा) : संदीप मोहोळ, सोपान कदम, संतोष कुंभार
भटक्या जमाती/विमुक्त जाती मतदार संघ (1 जागा) : अन्वर सिकीलकर
संघाच्या 11 पैकी पाच जागांवर प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने त्या जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र 11 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतरच त्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल. तसेच उर्वरित सहा जागांच्या लढतीचे अंतिम चित्रही त्याच दिवशी स्पष्ट होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी दिली.
- सन 1972 मध्ये मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची स्थापना झाली असून, वडगाव मावळ येथे मावळ पंचायत समितीच्या आवारात मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे कार्यालय आहे. तालुक्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सहकार क्षेत्रातील मावळ तालुक्यात ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मिसिंग लिंक झाला, आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याचा प्लॅन ; एमएसआरडीसीकडून सरकारला प्रस्ताव । Mumbai Pune Expressway
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पुणे जिल्ह्यातील 146 किमी पाणंद रस्ते मोकळे, मावळमधील 23.8 किमी पाणंद रस्ते मोकळे
– कामाची बातमी : भूमिअभिलेख विभागाकडून गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध, असा चेक करा तुमच्या गावचा नकाशा