Dainik Maval News : वारकऱ्यांमध्ये देव, देश, धर्म यांबद्दल आत्मियता निर्माण व्हावी आणि वारकऱ्यांमध्ये नेतृत्व गुणाचा विकास व्हावा या उद्देशाने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हभप नंदकुमार भसे, सचिव हभप रामदास पडवळ, उपाध्यक्ष दिलीप वावरे, कार्याध्यक्ष संतोष कुंभार यांच्या संकल्पनेतून मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने वेहेरगाव- दहिवली येथे दि १९ व २० रोजी दोन दिवसीय निवासी वारकरी नेतृत्व गुण विकास कार्यकर्ता शिबीराचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले.
बुधवार (दि. २०) रोजी या शिबीराची सांगता करण्यात आली. या शिबीरामध्ये ध्यानधारणा,प्रार्थना, संघटन,वारकरी सांप्रदायाचे महत्व, देव-देश- धर्म यांबद्दलचे मौलिक विचार व मार्गदर्शन अनेक अभ्यासू वक्त्यांकडून वारकऱ्यांना लाभले.
या दोन दिवसीय निवासी शिबीरासाठी मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अनेक पदाधिकारी,विभागीय अध्यक्ष, विभाग प्रमुख,शहराध्यक्ष,विविध समित्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी, ग्रामप्रतिनीधी आणि अनेक वारकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवासी शिबीरासाठी वेहेरगाव- दहिवली येथील वारकरी सांप्रदायाच्या पाईक हभप सुवर्णा कुटे यांनी सर्व वारकऱ्यांच्या मोफत निवासाची सुसज्ज अशी व्यवस्था केली, या शिबीरासाठी त्यांचे विशेष सहकार्य मंडळाला लाभले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! गणेशोत्सव काळात भारतीय रेल्वेच्या गणपती विशेष ३८० फेऱ्या, पाहा संपूर्ण नियोजन
– तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशनच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय ; आमदार सुनील शेळकेंच्या उपस्थितीत बैठक
– मोठा निर्णय ! मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (क्रमांक 48) बोरघाट भागात जड-अवजड वाहनांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश