Dainik Maval News : येळसे पवनानगर येथे झालेल्या मावळ मर्यादित ‘मावळ चषक कुस्ती स्पर्धेत वरिष्ठ विभागात सडवली गावचा युवा मल्ल महाराष्ट्र चॅम्पियन पै. केतन नथु घारे याने कान्हे गावच्या नयन गाडे याला चितपट करून मानाच्या मावळ चषक किताबावर आपले नाव कोरले तर कुमार विभागात कान्हे गावच्या राहुल सातकर याने जांभूळच्या सागर जांभूळकरला ११-२ अशा गुणाधिक्यांनी पराभव करून मावळ कुमार चषकाचा मानकरी ठरला. तसेच महिला विभागात जांभूळच्या भक्ती जांभूळकर हिने पिंपळोलीच्या संस्कृती पिंपळे हिचा १०-० अशा गुणाधिक्यांनी पराभव करून महिला मावळ चषकाची मानकरी ठरली.
पुणे जिल्हा कुस्तीगीर तालिम संघाच्या मान्यतेने व मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने सरपंच अशोकभाऊ राजिवडे युवा मंच मावळ यांच्या वतीने मावळ मर्यादित ‘मावळ चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ऑलिंपिक कुस्तीगीर व शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित पै. आडकर व मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. खंडू वाळूंज यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या स्पर्धेत १९८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस समारंभ ऑलिंपिकवीर व शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित पै. मारुती (आण्णा) आडकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. खंडू वाळूंज, स्पर्धा संयोजक आदर्श सरपंच अशोकभाऊ राजिवडे, भारतीय शैली कुस्ती महासंघाचे महाराष्ट्र सरचिटणीस पै. मोहन खोपडे, प्रा. किसन बुचडे, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव पै. बंडू येवले, सहसचिव ॲड. पप्पू कालेकर, उपाध्यक्ष पै. सचिन घोटकुले, राष्ट्रीय कुस्तीगीर पै. भरत लिमण, पै. तानाजी कारके, कार्याध्यक्ष पै. नागेश राक्षे, खजिनदार पै. मनोज येवले, पै. किशोर सातकर, वस्ताद पै. धोंडिबा आडकर, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पै.बाळासाहेब घोटकुले, मावळ केसरी पै. संदीप काळे, आंबेगावचे सरपंच सुधीर घरदाळे, उद्योजक विनायक राजिवडे, बाळासाहेब राजिवडे, सरपंच जयवंत घारे, वस्ताद चंद्रकांत वाळूंज, सरपंच महेंद्र वाळूंज, अतुल शेटे, सुरज ठाकर, दत्तात्रय दळवी,भारती विनायक राजिवडे, शितल अशोक राजिवडे, सुप्रिया दिलीप राजिवडे, रुपाली अजय राजिवडे नंदा सुरेश राजिवडे, पोलिस पाटील सारिका विजय राजिवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे
१४ वर्षाखालील बालगट
२२ किलो:- १) रुशील सवासे (कान्हे), २) सिध्देश वाघोले (कान्हे)
२५ किलो:- १) चैतन्य चिमटे (कुसवली), २) श्रीहरी गराडे (धामणे)
२८ किलो:- १) श्रवण बोडके (गहुंजे), २) आर्यन सातकर (कान्हे)
३२ किलो:- १) ओम पवार (काले), २) स्वरूप आंबेकर (उर्से)
३५ किलो:- १) स्वराज बोडके (गहुंजे), २) स्वरूप सातकर (कान्हे)
३८ किलो:- १) आदिनाथ हांडे (आंबळे), २) यश शिंदे (उर्से)
४२ किलो:- १) मेघराज काटे (आढले), २) अंश जाधव (टाकवे)
१७ वर्षाखालील कुमारगट
४२ किलो:- १) चैतन्य ठाकर (येळसे), २) तुषार मोरमारे (वडेश्वर)
४५ किलो:- १) वेदांत भोईर (आढले), २) आर्यन गायकवाड (उर्से)
४८ किलो:- १) साई चांदेकर (आढले), २) यश देशमुख (सडवली)
५१ किलो:- १ धिरज शिंदे (उर्से) २) साहिल दगडे (माळेगाव)
५५ किलो:- १) कार्तिक आडकर (शिवली), २) शौर्य गोपाळे (शिरगाव)
६० किलो:- १) ओम वाघोले (दारूंब्रे), २) तेजस कारके (आढे)
६१ ते १०० किलो कुमार चषक गट
१) राहुल सातकर (कान्हे), २) सागर जांभूळकर (जांभूळ)
वरिष्ठ विभाग
५७ किलो:- १) समीर ननावरे (टाकवे), २)सिध्देश वाघोले (दारूंब्रे)
६१ किलो:- १) सतिश मालपोटे (फळणे), २) रोहन जगताप (कशाळ)
६५ किलो:- १) साहिल शेळके (कडधे), २) युवराज सातकर (कान्हे)
७० किलो:- १) सनी केदारी (कुसगाव), २) करण कदम (नायगाव)
७१ ते १२५ किलो (मावळ चषक गट)
१) केतन घारे (सडवली), २) नयन गाडे (कान्हे)
महिला विभाग
२५ ते ३० किलो:- १) रेणुका नागवडे (तळेगाव), २) आरोही घाडगे (माळेगाव)
३० ते ३६ किलो:- १) ईश्वरी झुंजुरके (सोमाटणे), २) स्नेहा मैगुर (तळेगाव)
३६ ते ४० किलो:- १) आस्मी लोणारी (तळेगाव), २) कार्तिकी कालेकर (काले)
४० ते ४५ किलो:- १) ईश्वरी बोंबले (पिंपळोली), २) कृत्तिका पाठारे (कामशेत)
४५ ते ५० किलो:- १) अनुष्का दहिभाते (बेडसे), २) आराध्या भेगडे (तळेगाव)
५० ते ७६ किलो (महिला केसरी गट)
१) भक्ती जांभूळकर (जांभूळ) २) संस्कृती पिंपळे (पिंपळोली)
मावळ केसरी विजेत्या खेळाडूस स्व. पै. सचिनभाऊ शेळके यांच्या स्मरणार्थ शेळके परिवाराच्या वतीने चांदीची गदा तसेच आयोजकांकडून बुलेट गाडी, तसेच कुमार केसरी विजेत्या खेळाडूस व महिला केसरी विजेत्या खेळाडूस आयोजकांच्या वतीने चांदीची गदा, त्याचप्रमाणे बालगट व कुमार विभागाच्या प्रत्येक गटातील विजेत्यांना सायकल व रोख रक्कम,द्वितीय क्रमांकास चषक व रोख रक्कम बक्षीस देण्यात आले.
पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच रोहिदास आमले, बंडू येवले, ॲड.पप्पू कालेकर, चंद्रकांत मोहोळ, निलेश मारणे, विक्रम पवळे, प्रविण राजीवडे, राकेश सोरटे, भानुदास घारे, सुरेश आडकर, समीर शिंदे, प्रसन्ना पाटील, चंद्रशेखर शिंदे यांनी केले तर संपूर्ण स्पर्धेचे समालोचन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुस्ती निवेदक प्रा. हंगेश्वर धायगुडे यांनी केले. ( Maval wrestling tournament at Yelse Pavananagar Wrestlers Ketan Ghare Rahul Satkar Bhakti Jambhulkar won )
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सरकारची लाडक्या बहिणींवरील माया आटली ! ‘या’ महिलांची नावे वगळणार, दरवर्षी करावी लागणार ई-केवायसी । Ladki Bahin Yojana
– वडगावकरांचा लाडका शिवम, दीक्षा समारंभानंतर बनले ‘महक ऋषी’ ; दीक्षा समारंभासाठी भक्तीचा महापूर । Maval News
– खळबळजनक ! गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चार जणांचा एकावर प्राणघातक हल्ला, मावळ तालुक्यातील घटना । Maval Crime