Dainik Maval News : साते गाव, मावळ येथील नामवंत युवा वेटलिफ्टर कु. सार्थक संदीप आगळमे (वय १९) याचे गुरुवारी (दि.२७) रात्री साडेदहाच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, चुलते असा मोठा परिवार आहे.
सार्थक हा वडगाव मावळ येथील सह्याद्री जीमचा खेळाडू होता. त्याठिकाणी तो नियमित व्यायाम करीत असे. महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर विविध वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये त्याने विजय संपादन करून मोठा नावलौकिक मिळविला होता.
सार्थक आगळमे भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) क्रीडा प्रकारात साते गावचे नाव, पुणे जिल्ह्यात गाजविणारा युवा खेळाडू, पुणे जिल्हा सुवर्ण पदक विजेता म्हणून ओळखला जात होता. हसरा चेहरा, शांत स्वभाव यामुळे मित्र परिवारात तो सर्वांचा लाडका होता. सार्थकच्या आकस्मिक निधनामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ( Maval young weightlifter Sarthak Agalme passed away due to heart attack )
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा