Dainik Maval News : दारुंब्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मयूर संजय वाघोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच रामदास शशिकांत वाघोले त्यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच उमेश आगळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि 2) ग्रामपंचायतीच्या कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली.
उपसरपंच पदासाठी मयूर वाघोले यांचा ठरलेल्या मुदतीत एकमेव अर्ज दाखल झाल्याने सभेचे अध्यक्ष सरपंच उमेश आगळे यांनी उपसरपंच पदी मयूर वाघोले यांची निवड जाहीर केली. निवडणूक सहाय्यक म्हणून ग्रामसेवक नासिर पठाण यांनी काम पाहिले.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अर्चना गणेश वाघोले, सुवर्णा शरद भालेकर,अर्चना ईश्वर वाघोले, अनिल वाघोले, श्रीकांत वाघोले, रामदास वाघोले व इतर मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच मयूर वाघोले यांचा सत्कार करण्यात आला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी
– आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या