महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी शाळांच्या भौतिक आणि गुणवत्ता विकासाला गती देऊन राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शाळांना प्रसिद्धी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमात मावळ तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून तीन लाखाचे बक्षीसास पात्र ठरलेल्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक केंद्र शाळा कान्हे येथील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मुख्यमंत्री महोदयांना सुमारे चारशे शुभेच्छा पत्रे पाठवून अभिनंदन केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील सर्व शाळांना आपली गुणवत्ता आणि भौतिक सुविधा यात विलक्षण सुधारणा होण्यासाठी बक्षीस रूपाने मदतीचा हात देत ग्रामीण भागातील शाळा सुंदर करण्यात ऐतिहासिक निर्णय घेत हा उपक्रम सुरु केला. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असणारी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक केंद्रशाळा कान्हे, या शाळेने सहभागी होऊन मावळ तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी या निधीचा उपयोग होऊन या शाळेतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यात निश्चित फायदा होणार आहे. ( Mazi Shala Sundar Shala Students letter to CM ZP School Kanhe Village Maval Taluka )
कान्हे गावची आदर्श ग्रामपंचायत आणि प्रभावी काम करणारी शाळा व्यवस्थापन समिती यांनी झपाटून काम करून, स्वनिधी बरोबरच परिसरातील कंपन्याकडून सीएसआर मिळवत, दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, NGO, पालक यांच्याकडून रोख निधी आणि वास्तुरूपाने मदत घेवून भरीव विकासकामे केलेली आहेत. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या सुमारे 400 विद्यार्थ्याकडून मुख्यमंत्री महोदयांना या सुंदर उपक्रमाबद्दल शुभेच्छा पोस्ट कार्डवर लिहून सामूहिक शुभेच्छा पत्रे “कान्हे पोस्ट ऑफिस चे पोस्ट मास्टर ” मा.संतोष काकडे यांजकडे सुपूर्द केली.
ह्या स्तुत्य उपक्रमाचे नियोजन, शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला ढोरे यांनी करून सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी उत्तम सहकार्य केले. याकामी विशेष परिश्रम सुनिता देशमुख आणि दादासाहेब खरात यांनी घेतले. मावळ पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले, केंद्र प्रमुख अजित नवले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच कान्हे गावचे सरपंच विजय सातकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर सातकर व सर्व पदाधिकारी यांनीही सर्वांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
अधिक वाचा –
– वडगाव शहरातील जामा मस्जिद मधील विविध विकासकामांना सुरुवात; आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध
– दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी आमदार शेळकेंकडून मोफत वाहतूक सेवा, सलग 7 वर्षांपासून सुरु आहे उपक्रम
– IPS सत्यसाई कार्तिक यांची आणखी एक दमदार कामगिरी; पाच वर्ष जुन्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या