व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळातील रस्त्यांच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करा, बैलगाडा घाटासाठी निधीची तरतूद करा ; आमदार सुनिल शेळके यांची सूचना

मावळ तालुक्यातील पीएमआरडीए अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांसंदर्भात आयुक्त योगेश म्हसे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 29, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
meeting concluded in presence of PMRDA Commissioner Yogesh Mhse MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पीएमआरडीए अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांसंदर्भात पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीत पीएमआरडीए अंतर्गत मावळ तालुक्यात झालेल्या रस्त्यांच्या कामांबाबत चर्चा झाली. या रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी येत असून कामाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यात यावे, अशी सूचना आमदार सुनील शेळके यांनी यावेळी केली.

यासह इंद्रायणी व पवना नदी या दोन्ही नदी सुधार प्रकल्पांचे आराखडे तयार करून शासनास सादर करावेत. नद्यांमध्ये थेट दूषित पाणी, सांडपाणी सोडण्यात येत असेल त्या ठिकाणी एसटीपी प्लांटस बसवावेत, या कामास सुरुवात केल्यास काही प्रमाणात नदी प्रदूषणास आळा बसेल, असेही सांगितले. मावळ तालुक्यातील ऐतिहासिक तलावांचे पुनरुज्जीवन व सुशोभीकरणासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून निधीची तरतूद व्हावी. तसेच ग्रामीण भागात बैलगाडा घाट, देवस्थान परिसरातील सुशोभीकरण यासाठी देखील निधीची तरतूद करण्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मावळ तालुक्यात मोठे गृह प्रकल्प उभारले जात आहेत. अनेक ठिकाणी विकसकांकडून संपूर्ण भौतिक सुविधा दिलेल्या नसतानाही पूर्णत्वाचा दाखला देण्यात येतो. अशा प्रकल्पांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असुन सदनिकाधारकांना रस्ते, पाणी, वीज अशा सुविधा मिळत नसल्यामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यापुढे प्रकल्पांना पूर्णत्वाचा दाखला देताना प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सर्व गोष्टींची शहानिशा करुनच दाखले द्यावेत व या प्रक्रियेची तात्काळ अंमलबजावणी व्हावी अशी मागणी सुनील शेळके यांनी केली.

सदर बैठकीला आमदार सुनील शेळके यांसह मुख्य अभियंता अशोक भालेकर, सल्लागार विवेक खरवडकर, कार्यकारी अभियंता वसंत नाईक, वरिष्ठ अभियंता सुजय शेवाळे, नगररचना उपसंचालक सोनाली आहेर, एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिपक हुलावळे, माजी नगराध्यक्ष कारके, माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे, मारुती देशमुख, संजय बाविस्कर व इतर अधिकारी उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल ; दुपारी बारानंतर प्रवास करावा…
– मावळात होणार हरिनामाचा गजर ! कामशेत येथे एक जानेवारीपासून भव्य ‘कीर्तन महोत्सव’ – पाहा वेळापत्रक
– महाराष्ट्रात शुक्रवार – शनिवार दोन दिवस गारपीट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज ; सोमवारपासून थंडी वाढणार 


Previous Post

श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने सोमवारी 30 डिसेंबर रोजी वाहतूक मार्गात मोठा बदल – जाणून घ्या

Next Post

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल ; पाहा कोणते मार्ग बंद, कोणते सुरु

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vijaystambha- Bhima-Koregaon

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल ; पाहा कोणते मार्ग बंद, कोणते सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

government sudden increase in gas cylinder prices is unfair Maval Taluka Congress statement

सरकारने गॅस सिलिंडरची अचानक केलेली दरवाढ अन्यायकारक ; मावळ तालुका काँग्रेसचे निवदेन

March 12, 2026
MLA Sunil Shelke attention in session regarding issues in Dehuroad Cantonment area

रेडझोनचा प्रश्न, शिक्षण – आरोग्य – पाण्याची समस्या ; देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळके यांची अधिवेशनात लक्षवेधी

March 12, 2026
Agriculture Minister Dattatreya Bharane

खत विक्रीत अनियमितता आढळल्यास दोषी विक्रेत्यांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेणार – कृषी मंत्री

March 12, 2026
Katkari community gets benefit of Rs 2 lakh 39 thousand from government for building house with toilet

शौचालय सहीत घरकुल बांधणीसाठी कातकरी समाजाला सरकारकडून मिळतो २ लाख ३९ हजार रुपयांचा लाभ

March 12, 2026
Renovation of classrooms at New English School in Vadgaon with Rs 31 lakh CSR fund from Astemo Fi Company

ॲस्टेमो फाय कंपनीच्या ३१ लाख सीएसआर निधीतून वडगावमधील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या वर्गखोल्यांचे नूतनीकरण

March 11, 2026
Hope for the Children Foundation honors accomplished women in social and administrative fields in Maval

‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मावळातील सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

March 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.