व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील औद्योगिक आस्थापनांना महापालिकेकडून येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी बैठक पार पडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 2, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
meeting held under chairmanship of Anna Bansode to address problems in Pimpri-Chinchwad industrial area

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील औद्योगिक आस्थापनांना महापालिकेकडून येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत औद्योगिक व लघुउद्योगांसमोरील तातडीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

विधानभवनात पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक यांच्या विविध समस्या बाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा, पिपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी डॉ. अर्चना पठारे, महापारेषानचे अधिकारी व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले की, महापालिकेकडून विविध उद्योजकांना देण्यात आलेल्या एलबीटी च्या नोटिसांचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा. तसेच एलबीटी थकलेल्या उद्योजकाना भरण्यासाठी सवलत देण्यात यावी, असे निर्देश पिपरी-चिंचवड महापालिकेला अण्णा बनसोडे यांनी दिले.

उपाध्यक्ष बनसोडे म्हणाले की, टी-२०१ पुनर्वसन प्रकल्पाला गती देण्यात यावी. १९९२ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प २५ वर्षांनंतरही गाळे वाटपाच्या प्रक्रियेत अडकला आहे. २००६ मध्ये १४४ उद्योजकांनी प्रत्येकी ३० हजार रुपये भरले होते. सुरुवातीला गाळ्याचा दर १००० रुपये प्रति चौ.फुट असताना सध्या पालिकेने तो ५६०० रुपये केला आहे. हा दर उद्योजकांना परवडणारा नसल्याने १७८४ रुपये दराने गाळे विक्री करावी किंवा ६-७ रुपये दराने भाडेतत्त्वावर द्यावेत, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. गाळे वाटपाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी संयुक्त बैठक घ्यावी, असे निर्देश बनसोडे यांनी दिले.

औद्योगिक परिसरातील रस्त्यांची अवस्था लक्षात घेऊन तातडीने डांबरीकरणाचे काम हाती घ्यावे. पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणेकरीता सामुहीक सांडपाणी प्रक्रिया सयंत्रणा पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक क्षेत्रातील लघू उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर सीईटीपी उभारण्याच्या कामाला गती द्यावी.

बैठकीत औद्योगिक परिसरातील घनकचरा, घातक कचरा विल्हेवाट लावणे, बंद पथदिवे, अनधिकृत भंगारची दुकाने, औद्योगिक परिसरातील पाणीपुरवठा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. उपस्थित अधिकाऱ्यांना प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित होणार
– देहू नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन ; मिळकत धारकांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा । Dehu News
– तळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार; घटना सीसीटीव्हीत कैद
– चाकण, नाशिक फाटा येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; मंत्रालयात विशेष बैठक संपन्न


Previous Post

केंद्रीय मंत्रिमंडळाची चार बहुमार्गीकरण प्रकल्पांना मंजुरी ; महाराष्ट्रासह सहा राज्यांतील १३ जिल्ह्यांचा समावेश, २०२८-२९ पर्यंत काम पूर्ण होणार

Next Post

‘आमच्याकडे काय बघतोस’ असे म्हणत लाथा बुक्क्यांनी केली मारहाण ; सोमाटणे फाटा येथील प्रकार । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Biker beaten up for demanding compensation Incident at Somatane Phata Maval

‘आमच्याकडे काय बघतोस’ असे म्हणत लाथा बुक्क्यांनी केली मारहाण ; सोमाटणे फाटा येथील प्रकार । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval MLA Sunil Shelke met new Commissioner of PMRDA Abhijeet Chaudhary

लोणावळ्यातील प्रमुख रस्ते, नदी सुधार प्रकल्प, गडकिल्ल्यांचा विकास आदी प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळकेंनी घेतली PMRDA च्या नवीन आयुक्तांची भेट

March 21, 2026
Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.