पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर (Pune Lonavala Railway) आज, रविवारी (दि. 3) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे – लोणावळा लोकल सेवा आज बंद राहणार आहे. तांत्रिक कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. त्यामुळे पुण्याहून लोणावळ्याला जाणाऱ्या आणि लोणावळ्यातून पुण्याला येणाऱ्या सर्व लोकल रविवारी दिवसभर राहणार बंद राहणार आहे. एकूण 14 लोकल रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाकडून रद्द करण्यात आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
रद्द झालेल्या लोकल गाड्या :
1. पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 9:57 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
2. पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 11:17 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
3. शिवाजीनगरहून लोणावळ्यासाठी दुपारी 12:05 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
4. पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी 3 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
5. शिवाजीनगरहून तळेगावसाठी दुपारी 3:47 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
6. पुण्याहून लोणावळ्यासाठी सायंकाळी 4:25 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
7. शिवाजीनगरवरून लोणावळ्यासाठी सायंकाळी 5:20 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
8. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी 10:05 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
9.लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी 11:30 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
10. लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी 2:05 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
11. तळेगावहून पुण्यासाठी सायंकाळी 4:40 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
12. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी 5:30 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
13. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी 6:05 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
14. लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी 7 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
( Mega Block on Pune Lonavala Railway Route total 14 Local Train Cancelled Check list and time table )
अधिक वाचा –
– शिवे गावात महिलांना आर्थिक उन्नतीसाठी तीन दिवसीय मसाला बनवणे प्रशिक्षण शिबिर । Khed News
– ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमाबद्दल मावळमधील कान्हे शाळेच्या 400 विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभेच्छापत्र
– शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी 8 हजार मेगावॅट वीजनिर्मिती निश्चित, देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती