Dainik Maval News : मावळ तालुक्यातील इंदोरी–वराळे जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे तापमान दिवसेंदिवस वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार मेघाताई भागवत यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गुरुवारी गोळेवाडी परिसरात झालेल्या भेटीगाठी दरम्यान वडीलधारी मंडळी, माता-भगिनींनी प्रेमाने शुभेच्छा देत “आम्ही सर्व तुमच्या मागे ठामपणे उभे आहोत” असा विश्वास व्यक्त केला. या प्रेमळ प्रतिसादाने परिसरातील वातावरण उत्साही झाले आहे.
मेघाताई भागवत यांनी गेल्या काही वर्षांत सामाजिक कार्य, महिलांच्या प्रश्नांवरील सक्रिय भूमिका आणि सर्वसामान्यांशी जोडलेले आपुलकीचे नाते यामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
दरम्यान, आमदार सुनील शेळके यांची भूमिका काय असणार आणि उमेदवारी कोणाला मिळणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. मात्र, जनतेच्या प्रचंड पाठिंब्यामुळे मेघाताई भागवत या जिल्हा परिषद निवडणुकीच्या स्पर्धेत प्रमुख दावेदार ठरत आहेत. त्यांच्या सभोवताल तयार झालेलं सकारात्मक वातावरण आणि लोकांच्या उत्साही प्रतिसादामुळे या निवडणुकीत इंदोरी–वराळे गटात रंगतदार लढत होण्याची चिन्हे आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आचारसंहिता लागू, नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी – वाचा सविस्तर
– अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
