Dainik Maval News : बॅडमिंटन क्लासवरून घरी जात असताना एका विद्यार्थ्याला अडवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (२९ जुलै) सायंकाळी साडेसात वाजता सोमाटणे फाटा ( ता. मावळ ) येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
आशिष अभिमान सुरवसे (२५, पवार वस्ती, दापोडी), राहुल मिलींद सूर्यवंशी (२४, दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह चिक्या आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी १६ वर्षीय मुलाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बॅडमिंटन क्लासवरून घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. ‘आमच्याकडे काय बघतोस’ असे म्हणून फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी ‘मला मारू नका, मला सोडा’ अशी विनंती करत होता.
तरीही, त्यांच्यासोबत असलेल्या राहुल नावाच्या व्यक्तीने फिर्यादीच्या डोक्यातील हेल्मेटने त्यांच्या डोक्यात, छातीत, नाकावर आणि तोंडावर मारून गंभीर जखमी केले. तसेच आरोपी आशिष सुरवसे याने लाथा-बुक्क्यांनी छातीत आणि पोटात मारहाण करून गंभीर जखमी केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित होणार
– देहू नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन ; मिळकत धारकांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा । Dehu News
– तळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार; घटना सीसीटीव्हीत कैद
– चाकण, नाशिक फाटा येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; मंत्रालयात विशेष बैठक संपन्न