ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या अशी ओळख असणाऱ्या आमदार मनिषा कायंदे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. तसे अधिकृत पत्र पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मनिषा कायंदे या मागील अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा होत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्या शिंदे गटात अर्थात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती माध्यमांतून समोर आली. त्यानंतर रविवारी (दिनांक 18 जून) शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाकडून ही कारवाई कऱण्यात आली.
माहितीसाठी pic.twitter.com/CQWWoly9hE
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) June 18, 2023
काय म्हटलंय पत्रकात?
“शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी : प्रा. मनिषा कायंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माननीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री. उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.”
अधिक वाचा –
– मावळ लोकसभेसाठी खासदारकीच्या रेसमध्ये असलेल्या माधवी जोशी यांची सामाजिक कार्यातून घौडदौड सुरुच
– मावळात शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या दोन नव्या शाखांचे आमदार सचिन आहिर यांच्या हस्ते उद्घाटन